पुणे, 03 जानेवारी: पुण्यातून (Corona In Pune) कोरोना संदर्भातली (Big news) एक मोठी बातमी समोर येत आहे. नुकतीच पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) कोरोना आढावा बैठक (Corona Review meeting) पार पडली. त्यात दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित होताना दिसत असल्याचं समोर आले आहे. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.
27 डिसेंबर ते 1 जानेवारी या पाच ते सहा दिवसात पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ दिवसात पुण्यात अॅक्टिव्ह रुग्ण संख्या चौपट झाल्याचंही समजतंय. नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जातं असून 80 टक्के लोक दोन्ही डोस घेतलेली बाधित होताना दिसत असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीत सांगितलं आहे.
हेही वाचा- VIDEO..! घाटकोपरमध्ये अग्नितांडव, कारखान्याला भीषण आग
गेल्या 8 दिवसात वाढलेल्या रुग्ण संख्येचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं असून महापालिका त्या अर्थानं सुसज्ज असल्याचंही महापौर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
जम्बोचे स्ट्रक्चरल ॲाडिट केले आहे. 24 तासात मशिनरी सुरु होईल याचे नियोजन केलं असून गरज भासल्यास सुरु होणार, असंही ते म्हणालेत. तसंच 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर 340 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती महापौरांनी कोरोना आढावा बैठकीत दिली.
निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून क्वारंटाईनसाठी पुन्हा हॅाटेल सुरु करणार असल्याचंही ते म्हणालेत. तसंच लसीकरण राहिलेल्या लोकांपर्यंत तातडीने पोहोचण यासाठी प्राधान्याने प्रयत्न केला जाणार असल्याचंही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
पुण्यात Omicron चा उद्रेक
रविवारी राज्यात पुन्हा एकदा 50 रुग्ण आढळून आले आहे. या 50 रुग्णांपैकी 36 रुग्ण फक्त पुण्यात ( pune omaicron Patients) आढळले. तर राज्यात ओमायक्रॉनची संख्या 510 वर पोहोचली आहे.
हेही वाचा- VIDEO- इन्स्टा फिल्टरमुळे चक्रावली मीरा राजपूत ; Shahid Kapoor ने दिलं मजेदार उत्तर
राज्य आरोग्य विभागाने कोरोनाच्या परिस्थितीची माहिती प्रसिद्ध केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात नवे 50 ओमायक्रॅान रूग्णांचे निदान झाले आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत सर्वाधिक 36 रुग्ण आढळले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 8, पुणे ग्रामीण 02, सांगली 02, ठाणे आणि मुंबईमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर राज्यात ओमायक्रॉन रूग्णांचा आकडा आता 510 वर पोहोचला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pune, Pune cases