मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : इन्स्टा फिल्टरमुळे चक्रावली मीरा राजपूत ; Shahid Kapoor ने दिलं मजेदार उत्तर

VIDEO : इन्स्टा फिल्टरमुळे चक्रावली मीरा राजपूत ; Shahid Kapoor ने दिलं मजेदार उत्तर

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर  (Shahid Kapoor)  आणि मीरा राजपूत (  Mira Rajput)  हे बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत ( Mira Rajput) हे बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत ( Mira Rajput) हे बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 3 जानेवारी - बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर  (Shahid Kapoor)  आणि मीरा राजपूत (  Mira Rajput)  हे बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबत मस्ती करताना दिसतात. यासोबत फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करत असतात. आता मीरा राजपूतने पती शाहिद कपूरसोबतचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मीरा इन्स्टाचे एक नवीन फिल्टर ट्राय करताना दिसत आहे. मात्र हे फिल्टर शाहिद कपूरवर काम करत नाही. चाहत्यांना देखील यांचा हा मजेदार व्हिडिओ आवडलेला आहे.

शाहिदने मीराला दिलं उत्तर

मीराने तिच्या इन्स्टावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मीरा शाहिदवर इन्स्टाचे हे नवीन फिलटर ट्राय करताना दिसत आहे. मात्र हे फिल्टर शाहिदवर काम करत नसल्याचे दिसत आहे.मग तिने फोन तिच्या दिशेने वळवला आणि तिचा चेहरा पूर्णपणे बदलला. मीरा पुन्हा एकदा फोन शाहिदच्या चेहऱ्याकडे वळवते पण काहीच होत नाही. यावेळी मीरा म्हणते की, तुझ्यावर हे का काम करत नाही? यावर शाहिद कपूर म्हणतो की, कारण माझा चेहरा परफेक्ट आहे.

वाचा-'त्या' एका मुलाखतीमुळं सनी लिओनी आजही होते अस्वस्थ.., आता केला खुलासा

मीरा राजपूतने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे फिल्टर शाहिदवर का काम करत नाही? मी पूर्णपणे वेगळी दिसत आहे. मग काय यानंतर चाहतेही मीरासोबत मस्ती करण्यात गुंग झाले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, 'शाहिदने म्हटल्याप्रमाणे त्याचा चेहरा परफेक्ट आहे.' तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, 'कारण तो जन्मत:च हॅण्डसम आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'बॉस माणसाला फिल्टरची गरज नाही.'

शाहिद कपूरच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर त्याचा 'जर्सी' चित्रपटाची रिलीड डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता, जो कोरोनामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. यामुळे शाहिदही खूप निराश झाला होता. तो आणि त्याचे चाहते खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता पुन्हा एकदा या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकल्याची माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Shahid Kapoor-Mira Rajput