जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 65 वर्षीय वृद्धाने पाळीव श्वानावर केले अनैर्गिक अत्याचार, VIDEO स्टिंग ऑपरेशनमुळे घटना उजेडात

65 वर्षीय वृद्धाने पाळीव श्वानावर केले अनैर्गिक अत्याचार, VIDEO स्टिंग ऑपरेशनमुळे घटना उजेडात

घरात पाळलेली कुत्रीस खायचे अमिष दाखवून घरामध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले.

घरात पाळलेली कुत्रीस खायचे अमिष दाखवून घरामध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले.

घरात पाळलेली कुत्रीस खायचे अमिष दाखवून घरामध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

खेड, 28 ऑगस्ट : पुणे (pune) जिल्ह्यातील खेड (khed) तालुक्यात किळसवाणी घटना समोर आली आहे. टाकळकरवाडी गावात एका 65 वर्षीय ज्येष्ठ वयोवृद्धाने पाळीव कुत्रीवर (pet dog) अत्याचार केल्याचा घाणेरडा प्रकार उघड झाला असून हे कृत्य करताना त्याचे व्हिडिओ काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळकरवाडी गावात हा प्रकार घडला आहे. ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. भिवसेन धोंडीबा टाकळकर (राहणार, टाकळकरवाडी ता. खेड) असं या विकृताचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे. खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात येथे भिवसेन टाकळकर राहतात. त्याने राहत्या घरात पाळलेली कुत्रीस खायचे अमिष दाखवून घरामध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला. ज्येष्ठ नागरिकाने असे कृत्य केल्यामुळे सगळेच हैराण झाले होते. त्यामुळे या तरुणांनी याबाबत एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. (पुणे : वेबसीरिज पाहून रचला हत्येचा कट, प्रेमात अडथळा ठरल्याने भरदिवसा तरुणाचा खून) पोलिसांनी आयपीसी कलम ३७७ (अप्राकृतिक गुन्हे) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नवनाथ रानगट करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात