जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुणे : वेबसीरिज पाहून रचला हत्येचा कट, प्रेमात अडथळा ठरल्याने भरदिवसा तरुणाचा खून

पुणे : वेबसीरिज पाहून रचला हत्येचा कट, प्रेमात अडथळा ठरल्याने भरदिवसा तरुणाचा खून

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आरोपींनी आधी मोबाइलवर गुन्हेगारीशी संबंधित क्राइम वेब सिरीज, चित्रपट तसेच मालिका पाहिल्या होत्या.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 27 ऑगस्ट : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागच्या घटनांची आकडेवारी पाहिली तर पुण्यातही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने एका तरुणाचा खून करण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. ही घटना खराडी येथे घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - खराडी येथे कचरा वेचण्यासाठी गेलेल्या तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. अक्षय प्रकाश भिसे (वय 26, रा. दिनकर पठारे वस्ती, खराडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खुनाचा उलगडा झाला आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे. संतोष सत्यवान शिंदे (वय 28, बिदर, कर्नाटक, मूळ रा. कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर) आणि संग्राम ऊर्फ बाबू राजू बामणे (रा. कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने केली. वेब सीरिज पाहून हत्येचा कट - वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी सांगितले, की आरोपींनी आधी मोबाइलवर गुन्हेगारीशी संबंधित क्राइम वेब सिरीज, चित्रपट तसेच मालिका पाहिल्या होत्या. ते पाहूनच त्यांनी अक्षयच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेश येथून पिस्तूलही खरेदी केले. पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्याचा कसुन तपास करत आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना अटक केली. हेही वाचा -  पुणे-सोलापूर महामार्गावर गोळीबाराचा थरार, आधी पाठलाग, नंतर फायरिंग, 3 कोटी 60 लाखांची रोकड लुटली सीसीटीव्ही फुटेज तपासले - अक्षय भिसे या खराडी येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा 21 ऑगस्टला खून करण्यात आला होता. सकाळच्या सुमारास तो कचरा वेचण्यासाठी गेला असता दोघांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि त्याचा खून केला. याच प्रकरणाचा समांतर तपास चंदननगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाकडूनही सुरू होता. 21 ऑगस्टला ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. अखेर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात