मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pune : 144 वर्षांच्या लज्जतदार चवीची अखंड परंपरा, 4 पिढ्यांनी जपलं पुणेकरांशी नातं, VIDEO

Pune : 144 वर्षांच्या लज्जतदार चवीची अखंड परंपरा, 4 पिढ्यांनी जपलं पुणेकरांशी नातं, VIDEO

X
पुण्यातील

पुण्यातील एक हॉटेल गेली 144 वर्ष लज्जतदार चवीच्या जोरावर आपली खासियत राखून आहे. या हॉटेलमालकांची चौथी पिढी सध्या व्यवसायात असून त्यांनी देखील ही परंपरा समर्थपणे सांभाळली आहे.

पुण्यातील एक हॉटेल गेली 144 वर्ष लज्जतदार चवीच्या जोरावर आपली खासियत राखून आहे. या हॉटेलमालकांची चौथी पिढी सध्या व्यवसायात असून त्यांनी देखील ही परंपरा समर्थपणे सांभाळली आहे.

  पुणे, 15 ऑगस्ट : हॉटेल आणि रेस्टॉरांटच्या युगात रोज नव्या संकल्पना जन्माला येतात. नवीन स्पर्धक दाखल होतात. हा उद्योग चांगला चालवण्यासोबतच दीर्घकाळ चालवणे हे देखील मोठं आव्हान आहे. पुण्यातील एक हॉटेल गेली 144 वर्ष लज्जतदार चवीच्या जोरावर आपली खासियत राखून आहे. या हॉटेलमालकांची चौथी पिढी सध्या व्यवसायात असून त्यांनी देखील ही परंपरा समर्थपणे सांभाळली आहे.

  144 वर्षांची परंपरा

  पुण्यातील पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये 'दोराबजी अँड सन्स' (Dorabjee and sons)  हे सर्वात जुने रेस्टॉरंट आहे. 1878 साली या रेस्टॉरंटची स्थापना सोराबाजी दोराबजी या पारसी गृहस्थाने केली. आणि गेले 144 वर्ष झाले पुणेकर खवय्यांच्या जिभेचे चोचले त्या रेस्टॉरंटद्वारे पुरवले जातात. दोराबाजी यांनी एका छोट्या चहाच्या दुकानापासून आपल्या रेस्टॉरंटची सुरुवात कॅम्पमध्ये केली. पारशी लोकांच्या अस्सल पदार्थासाठी हे रेस्टॉरंट ओळखले जाते. विशेष म्हणजे गेल्या १४४ वर्षापासून त्यांनी ही खास चव जोपासली आहे. याबाबत दोराबाजी सांगतात की, 'पारशी पध्दतीचे जेवण आम्ही अजूनही कोळशांवर बनवतो. आणि ते बनवायला खूप वेळ लागतो.  पाथरानी मच्छी, मटण खिमा, मटण बिर्याणी, लग्नमें कस्टड, लिव्हर, भेजा, पुलाव दाल, हे पारंपारिक पारसी  पदार्थ आमची खासियत आहे.'

  गेल्या चार पिढ्यांपासून पुण्यातील दोराबाजी अँड सन्स हे रेस्टॉरंट दिमागदारपणे कॅम्प मध्ये खवय्यांची सेवा करत आहे. त्यामुळे या हॉटेलचा ग्राहकही तितकेच जुने आहेत. गेल्या दोन-तीन पिढ्यांपासून नियमितपणे या हॉटेलमध्ये पारसी पदार्थ खाण्यासाठी येणारे ग्राहक या हॉटेलात हमखास भेटतात.

  Pune : कसा असतो पारशी नववर्ष दिन? जाणून घ्या अनेक शतकांची परंपरा, VIDEO

  काळ बदलला, चव कायम

  काळानुसार अनेक बदल होत असले तरी जुन्या रेसिपी तशाच ठेवण्याचं अवघड काम या रेस्टॉरंटनं केलं आहे.  यामधील पुलाव दाल शिजण्यासाठी तब्बल 3 तास वेळ लागतो. पाथरानी मच्छी विशिष्ट मसाले वापरून केळीच्या पानांमध्येच बनवली जाते. इथं मटण रस्सा वेगळा शिजवून त्यामध्ये लागेल तसे मटणाचे तुकडे टाकून ग्राहकांना दिले जातात. खाद्यपदार्थ बनवण्याची ही परंपरा जपल्यानंच खवय्या पुणेकरांचे हे आवडचे ठिकाण आहे. अनेकदा दुपारी एक वाजताच इथले सर्व पदार्थ संपले असतात.

  या रेस्टॉरंटचा 'लगन मे कस्टर्ड' हा गोड पदार्थ देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. तसंच त्यांनी ग्राहकांसाठी पार्सल सेवा देखील सुरू केली आहे. पारशी सणाच्या काळात इथं मोठी गर्दी होते.

  गुगल मॅप वरून साभार

  रेस्टॉरंटची वेळ - सकाळी दहा ते संध्याकाळी सात, सोमवारी बंद

  पार्सल सेवेसाठी संपर्क -02026145955

  First published:

  Tags: Food, Parsi, Pune