जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तब्बल 130 किलो आईस्क्रीमचा लाडू दगडूशेठच्या चरणी अर्पण, पाहा VIDEO

तब्बल 130 किलो आईस्क्रीमचा लाडू दगडूशेठच्या चरणी अर्पण, पाहा VIDEO

तब्बल 130 किलो आईस्क्रीमचा लाडू दगडूशेठच्या चरणी अर्पण, पाहा VIDEO

130 किलो वजनाचा मोतीचूर लाडू मिश्रित आईस्क्रीमचा प्रसाद गणपतीच्या चरणी अर्पण केला आहे. हा अनोखा प्रसाद घेण्यासाठी गणेशभक्तांचीही झुंबड उडाली होती.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे : पुणे शहराची ओळख म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Halwai Ganpati) ओळखला जातो. अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपतीला विविध प्रकारचे प्रसाद आणि भोग चढवले जातात. सध्या गणेशोत्सवाची पुण्यामध्ये मोठी धामधूम सुरू आहे. यामध्येच पुण्यातील आईस्क्रीम (Ice-cream) बनवणाऱ्या एका व्यापाऱ्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोतीचूर बुंदीचा 130 किलोचा आईस्क्रीम प्रसाद अर्पण केला आहे. हा अनोखा प्रसाद घेण्यासाठी गणेशभक्तांचीही झुंबड उडाली होती. (Ganeshutsav 2022)  प्रसाद बनवण्यासाठी 5 ते 6 दिवसाचे परिश्रम शहरातील प्रसिद्ध किगा आईस्क्रीम बनवणाऱ्या किरण साळुंखे आणि गणेश गोसावी या व्यापाऱ्याने मंडळाच्या 130 व्या वर्षानिमित्त 130 किलो वजनाचा मोतीचूर लाडू मिश्रित आईस्क्रीमचा प्रसाद गणपतीच्या चरणी अर्पण केला आहे. याबाबत किरण साळुंखे यांनी सांगितले की, दरवर्षी आम्ही दगडूशेठ गणपतीला आमच्याकडून छोटी मोठी भेट देत असतो. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला भाविकांसाठी जास्त काय करता आले नाही. यामुळे या वर्षी आम्ही दगडूशेठ गणपतीला हा मोतीचूर लाडू मिश्रित आईस्क्रीम प्रसाद म्हणून अर्पण केला आहे. हा विशेष प्रसाद बनवण्यासाठी 5 ते 6 दिवसाचे परिश्रमाने लागले आहे. हा प्रसाद गणपतीला अर्पण केल्यानंतर भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला. हेही वाचा- खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ, पाहा VIDEO गणपतीला विविध प्रकारचे प्रसाद  वर्षभर दगडूशेठ हलवाई गणपतीला विविध प्रकारचे प्रसाद आणि भोग अर्पण केले जातात. प्रत्येक सीजननुसार विविध फळे जसे की द्राक्ष, सफरचंद, अंजीर, आंबे असे फळांचे महोत्सव देखील साजरी करतात. यामध्ये दगडूशेठला हे प्रसाद अर्पण केले जातात. गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये गेल्या नऊ दिवसापासून गणपतीला पेढे, मिठाई, बर्फी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज असलेले प्रसादाचा भोग चढवला गेलेला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात