अमित राय, पुणे 29 सप्टेंबर : पुण्यातील हडपसरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यात एक काँक्रीटचा कंटेनर चार ऑटोरिक्षांना धडक देत एका मोठ्या झाडावर जावून आदळला. ही धडक एवढी जबर होती, की पूर्ण झाड उन्मळून पडलं. थरकाप उडवणारी ही संपूर्ण घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेत काँक्रीट कंटेनरच्या क्लिनरचा मृत्यू झाला आहे, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पालघरमध्ये तरुणीवर झालेल्या गोळीबाराचा Live Video, मदत करण्याऐवजी वाटसरूने काढला पळ या घटनेचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि कंटेनर बाजूला काढण्याचं काम सुरू केलं.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एक दुचाकी चालक अचानक चुकीच्या बाजूने टँकरच्या समोर आला, कंटेनर चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता कंटेनरवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला आहे.
पुण्यातील हडपसरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यात एक काँक्रीटचा कंटेनर चार ऑटोरिक्षांना धडक देत एका मोठ्या झाडावर जावून आदळला. ही धडक एवढी जबर होती, की झाडही कोसळलं. घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे pic.twitter.com/YwFoc9D24f
— News18Lokmat (@News18lokmat) September 29, 2022
पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की कंटेनर एका झाडाला धडकून पलटी झाला. हे झाड कोसळून तिथे उभा असलेल्या दोन नागरिकाच्या अंगावर पडलं असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं. तर, कंटेनर खाली रिक्षा आल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. हडपसर येथील गाडीतळ येथे हा अपघात झाला आहे. कट की दुर्घटना? जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल पंपावरच प्रवासी बसमध्ये मोठा स्फोट, घटनेचा Live Video अपघातानंतरचे घटनास्थळावरील काही फोटो समोर आले आहेत, जे पाहून हा अपघात किती भयानक होता याची कल्पना येते. यात रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून बाजूला मोठं झाडही कोसळल्याचं पाहायला मिळतं. घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.