पुणे, 17 नोव्हेंबर : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरूवात झाली आहे. राज्यभरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं, पण या आंदोलनात महिला कार्यकर्त्याने गोंधळ घातला. पुण्यात आंदोलनादरम्यान शिंदे गटातील महिलेने राहुल गांधी समजून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला चप्पल मारण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना वेळीच ही चूक लक्षात आली आणि त्यांनी या महिलेला रोखलं. त्यानंतर राहुल गांधी कोण आहेत, हे या महिलेला दाखवून दिले. या गोंधळाचा व्हिडिओ समोर आला आहे.
राहुल गांधी समजून सावरकरांच्या फोटोलाच चप्पल मारण्याचा प्रयत्न; शिंदे गटातील महिलेचा आंदोलनादरम्यान गोंधळ, पुण्यातला प्रकार#RahulGandhi #VeerSavarkar pic.twitter.com/h6ap9XnpIU
— News18Lokmat (@News18lokmat) November 17, 2022
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेतल्या जाहीर सभेमध्ये राहुल गांधींनी सावरकरांबद्दल वक्तव्य केलं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा भाजप, मनसे आणि शिंदे गटाकडून निषेध नोंदवला गेला. तसंच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, अशी मागणीही केली. …खपवून घेणार नाही, राहुल गांधींच्या ओपन चॅलेंजवर बावनकुळेंचा हल्लाबोल दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आपण राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे मनसेही राहुल गांधींविरोधात आक्रमक झाली आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची सभा शेगावला होणार आहे, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना शेगावला जाण्याचे आदेश दिले आहेत. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली, हिम्मत असेल तर….राहुल गांधी यांचं भाजपाला थेट आव्हान