मुंबई, 29 जून : कोरोनाव्हायरसशी (Coronavirus) दोनहात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) सर्वात महत्त्वाचं असं पाऊल उचललं आहे. प्रोजेक्ट प्लॅटिना अंतर्गत (Project Platina) महाराष्ट्रात व्यापक स्तरावर प्लाझ्मा थेरेपी ट्रायल (Plasma Therapy Trial) करण्याचा निर्णय घेतला आहे. हे जगातील सर्वात मोठं प्लाझ्मा थेरेपी ट्रायल आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या ट्रायलला परवानगी दिली आहे.
राज्य सरकारचं वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग या ट्रायलचं नेतृत्त्व करणार आहे. राज्यातील 17 मेडिकल कॉलेज आणि बीएमसी अंतर्गत चार मेडिकल अशा एकूण 21 वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरेपीचं ट्रायल केलं जाईल.
‘Project PLATINA’-World’s Largest convalescent plasma therapy trial cum treatment of severe COVID 19 patients was today launched by @Maha_MEDD & inaugurated by CM Uddhav Balasaheb Thackeray. pic.twitter.com/wkbRaoaEP6
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 29, 2020
राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षण विभागाला प्लाझ्मा थेरेपी ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे. जगातील सर्वात मोठं हे प्लाझ्मा ट्रायल असेल. यामध्ये कोरोनावर मात केलेल्या जवळपास 500 लोकांचे सॅम्पल घेतले जातील.
हे वाचा - मस्जिदमध्येच उभारलं ऑक्सिजन सेंटर, सर्व जाती धर्मातील रुग्णांना मिळतात उपचार
या ट्रायलदरम्यान कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारही केले जाणार आहेत. ज्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपीचं ट्रायल केलं जाईल त्यांच्यावर मोफत उपचार होणार आहेत. या ट्रायलच्या परिणामांवरच देशातील इतर गंभीर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी मदत मिळेल.
ट्रायलचे समन्वयक डॉ. मोहम्मद फैजल यांच्या मते, पुढील सहा महिन्यांत प्लाझ्मा थेरेपीने जवळपास पाच हजार गंभीर कोरोना रुग्णांचा जीव वाचवता येईल. इतक्या मोठ्या स्तरावर ट्रायलच्या परिणामांमुळे भारतासारख्या देशात कोरोनावरील उपचारात टर्निंग पॉइंट असेल.
Similarly, I request those who were cured of Corona to come forward and donate their blood plasma, as it contains antibodies which can help cure those who are fighting the disease.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2020
त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या जास्तीत जास्त लोकांनी पुढाकार घ्यावा आणि प्लाझ्मा दान करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी केलं आहे.
काय आहे प्लाझ्मा थेरेपी?
कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. जेणेकरून त्या प्लाझ्मातील अँटिबॉडीज रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतील.
हे वाचा - कोरोना रुग्णाने मृत्यूआधी बनवला Video, म्हणाला- पप्पा, श्वास घेता येत नाही आणि..
डॉक्टरांनी सांगितलं की, जो रुग्ण 3 आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा घेतले जातात. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाझ्मा घेतलं जाऊ शकतो, तर कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा चढवलं जातं.
संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus disease