मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मशिदीतच उभारलं ऑक्सिजन सेंटर, सर्व जाती धर्मातील रुग्णांना मिळतो उपचार

मशिदीतच उभारलं ऑक्सिजन सेंटर, सर्व जाती धर्मातील रुग्णांना मिळतो उपचार

रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजन व्हेंटिलेटर या ऑक्सिजन सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजन व्हेंटिलेटर या ऑक्सिजन सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजन व्हेंटिलेटर या ऑक्सिजन सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

भिवंडी, 29 जून : भिवंडी शहरातील शांतीनगर भाजी मार्केट परिसरात जमात ए इस्लाम ए हिंद मस्जिद ट्रस्ट भिवंडी अंतर्गत असलेल्या मक्काह मस्जिदमध्ये मस्जिद ट्रस्टच्या वतीने ऑक्सिजन सेंटर उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकटात कोरोनासह इतर आजारपणातील रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजन व्हेंटिलेटर या ऑक्सिजन सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

देशासह भिवंडी शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यातच भिवंडी शहरातील कोरोना व कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारपणातील रुग्णांना उपचार मिळत नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. भिवंडी शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या 2533 वर पोहचली असून 114 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या भीतीने शहरातील अनेक खासगी रुग्णालये रुग्णांवर उपचार करत नाहीत हे उघड सत्य आहे. अनेक अत्यावस्थ रुग्णांना खासगी रुग्णालये तपासणी न करता पुढच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असल्याने रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवण्यातच अनेक रुग्णांना आपल्या जीवाला मुकावे लागत आहेत.

रुग्णांची होणारी ही हेळसांड व गैरसोय लक्षात घेता शांतीनगर येथील मक्का मस्जिदने रुग्णांसाठी ऑक्सिजन सेंटर उभारले आहे. विशेष म्हणजे हे ऑक्सिजन सेंटर रुग्णांसाठी पूर्णतः मोफत सुविधा पुरवत आहे. मस्जिदमध्ये उभारलेल्या या ऑक्सिजन सेंटरमध्ये हिंदू मुस्लीम बांधवांसह सर्व जाती धर्माच्या रुग्णांवर तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करून तत्काळ उपचार केले जात आहेत. 18 जून पासून हे ऑक्सिजन सेंटर या ठिकाणी रात्रंदिवस चोवीस तास सुरु आहे.

ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा रुग्णांना या ऑक्सिजन सेंटरमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करण्यात येते जोपर्यंत रुग्णांना रुग्णालये उपलब्ध होत नाही तोपर्यंत या ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना या ऑक्सिजन सेंटरमध्ये ऑक्सिजन पुरविण्यात येत आहे. या ऑक्सिजन सेंटर मध्ये सध्या 5 बेड व 8 ऑक्सिजन बाटले उपलब्ध असून 2 नेबिलायझर उपलब्ध आहेत. ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो त्या रुग्णांना येथे तात्काळ उपचार देण्यात येतात त्यासाठी या ऑक्सिजन सेंटर मध्ये 4 ते 5 डॉक्टर तत्काळ उपलब्ध करण्यात येत असून 7 जणांचा मेडिकल स्टाफ व डॉ. सलीम शेख व डॉ. सर्फराज खान हे दोन असिस्टन्स डॉक्टर येथे चोवीस तास उपलब्ध असून सध्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्व रुग्णांना येथे ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे.

सुरक्षिततेच्या सर्व साधनांचा वापर करून रुग्णांना येथे मोफत उपचार देण्यात येत आहेत. त्याच बरोबर ज्या रुग्णांना या ऑक्सिजन सेंटर पर्यंत येता येत नाही किंवा ज्या रुग्णांना ऑक्सिजनची जास्त आवश्यकता आहे अशा रुग्णांना घरी जाऊन ट्रस्टच्या वतीने ऑक्सिजन पुरविण्यात येत आहेत. त्यासाठी 30 छोटे ऑक्सिजन बाटले या ऑक्सिजन सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

माणुसकीची जाण ठेवत थेट मस्जिदमध्ये उभारलेले हे ऑक्सिजन सेंटर म्हणजे सध्यच्या कोरोना संकटात रुग्णांसाठी व येथील नागरिकांसाठी जीवनदान सेंटरच ठरत आहे. विशेष म्हणजे शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांवर देखील या ऑक्सिजन सेंटर मध्ये उपचार केले जात आहेत. आतापर्यंत या मक्काह मस्जिद ऑक्सिजन सेंटर मध्ये 140 हुन अधिक रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा व उपचार करण्यात आले असून त्यात 23 हिंदू बांधवांनी देखील उपचार घेतले आहेत. या ऑक्सिजन सेंटर साठी रियाज शेख , कैसर मिर्जा , अर्शद मिर्जा व त्यांचे सहकारी तसेच मक्काह मस्जिद व शांतीनगर ट्रस्टचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत.

एकीकडे मरकज कार्यक्रमामुळे कोरोनाचा प्रसार वाढला असल्याची टीका सर्वत्र होत असतांना सध्याच्या कोरोना संकटात कोरोनाशी दोन हात करत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुस्लीम बांधवांनी थेट मस्जिदमध्येच सर्व धर्मीय बांधवांसाठी मोफत ऑक्सिजन सेंटर उभारून देशात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

First published:

Tags: Bhiwandi, Coronavirus