विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 28 जून : लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे सर्वच पक्षांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. महाविकासआघाडीने सुद्धा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. उद्धव ठाकरेंकडच्या बंड केलेल्या खासदारांच्या काही जागा आम्हाला द्या, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे. दुसरीकडे ठाकरेंनी मात्र आम्हाला 19 जागांवर निवडणूक लढवायची असल्याचं ठणकावलं आहे. त्यामुळे जागावाटपावरून महाविकासआघाडीमध्ये नाराजीनाट्य रंगणार हे आता स्पष्ट झालं आहे. अशोक चव्हाणांचं सूचक विधान शिवसेना नेते अनिल परब कोर्टामध्ये होते, त्यामुळे ते नव्हते अशी माझी माहिती आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. ठाकरेंकडे असलेल्या 19 जागा त्यांच्याकडेच असाव्यात असं त्यांचं मत आहे, पण चर्चेला बसल्यानंतर तो विषयही मार्गी लागू शकतो. राज्यातली राजकीय परिस्थिती बदलली आहे. बदलेल्या परिस्थितीनुसार तिघांनाही ऍडजस्ट करून घ्यावं लागणार आहे. राज्यातली सध्याची परिस्थिती आणि मेरिट या दोन्हींचं कॉम्बिनेशन झालं तर योग्य होऊ शकतं. ज्या जागा निवडून आल्या होत्या आणि जे खासदार आहेत त्या पक्षात तिकडे काही अडचण येईल, असं वाटत नाही. जे खासदार अन्य पक्षात गेले आहेत, तिथली परिस्थिती काय आहे, हा विषय आहे. तिथली राजकीय परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घेणं अपेक्षित आहे, असं सूचक विधान अशोक चव्हाण यांनी केलं आहे. सेनाभवनासमोरच आदित्य ठाकरेंच्या गाडीला अपघात, वेगात येणाऱ्या बाईक स्वाराची धडक, Video ठाकरेंचे 13 खासदार शिंदेंकडे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते, यातले 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. यामध्ये दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, यवतमाळ, कल्याण, हातकणंगले, कोल्हापूर, बुलढाणा, नाशिक, मावळ, हिंगोली, रामटेक, परभणी, शिर्डी या मतदारसंघातले खासदार आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. या जागा आपल्याकडेच राहाव्यात यासाठी ठाकरे गट आग्रही आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र या जागांचं वाटप मेरिटनुसार व्हावं, असं वाटत आहे. सुनिल केंद्रेकर लोकसभा निवडणूक लढवणार? स्वेच्छा निवृत्तीची Inside Story
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.