सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 28 जून : सुनिल केंद्रेकर यांची स्वेच्छा निवृत्ती चर्चेचा विषय ठरली आहे. बिनधास्त कडक आणि सामाजिक भान असलेला अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. शेतकऱ्यांच्या न्यायाबाबत केलेल्या मागणीसाठी त्यांना स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली अशी राजकीय चर्चा आहे, मात्र त्यांनी निवृतीबद्दल अनेकदा वक्तव्य केली होती. सुनील केंद्रेकर म्हणजे प्रशासकीय कामकाजावर पकड आणि धाक असलेला अधिकारी. ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली त्या ठिकाणी त्यांनी धडाकेबाज कारवाई केल्या. बीडमध्ये त्यांची बदली रोखण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. मराठवाड्यात पाण्याची कमतरता असल्याने ऊस पिकांवर बंदी घातली पाहिजे, त्यांच्या या अहवालाची खूप चर्चा झाली. मराठवाडा विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी चांगले काम केले. खास करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ याविषयी त्यांनी एक सर्वे सुरू केला. आणि शासनाला एकरी 10 हजार देण्याची सूचना केली, याच मुळे शासन आणि केंद्रेकर यांच्यात बिनसले, असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. प्रदीप कुरूलकर प्रकरणात ट्विस्ट; DRDO कडून घडली मोठी चूक! सुनिल केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सततचा दुष्काळ या विषयावर सर्वे सुरू केला होता आणि सर्वे अंती शासनाला ते उपाय सुचवणार होते. सर्वे पूर्ण होण्या आधीच त्यांनी शेतकऱ्यांना एकरी 10 हजार मदत द्यावी अशी शिफारस करणार असल्याचे प्रसार माध्यमांना बोलून दाखवले. सुनिल केंद्रेकर यांनी मांडलेली हीच भूमिका अडचणीची ठरली अशी चर्चा आहे. अहवाल पूर्ण होण्याआधीच माध्यमांना सांगणे हे शासनातील अनेकांना पटलेलं नाही. वरिष्ठ पातळीवरील अधिकारी नेत्यांशी या भूमिकेवर त्यांचे खटके उडाले. शेवटी त्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला आणि तो शासनाने मान्यही केला आहे. एवढच नाही तर स्वेच्छा निवृत्तीनंतर केंद्रेकर परभणी लोकसभा लढवतील अशीही शक्यता बोलली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.