Home /News /nashik /

आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनी आढळली मृतावस्थेत; नाशकातील खळबळजनक घटना

आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनी आढळली मृतावस्थेत; नाशकातील खळबळजनक घटना

Suicid in Nashik: नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर येथील गिरीजादेवी प्राथमिक आश्रम शाळेत शिकणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीनं आत्महत्या (12 years old student commits suicide) केली आहे.

    नाशिक, 02 जानेवारी: काही दिवसांपूर्वी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील हातधुई येथील एका आश्रमशाळेतील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या (12th class student commits suicide) केल्याची घटना उघडकीस आली होती. पाच दिवसांपासून बेपत्ता राहिल्यानंतर, शाळेपासून 50 मीटर अंतरावरील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला होता. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची ही घटना ताजी असताना, नाशकातील आश्रम शाळेत एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. नाशिक (nashik) जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर येथील गिरीजादेवी प्राथमिक आश्रम शाळेत (Ashram school) शिकणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीनं आत्महत्या (12 years old student commits suicide) केली आहे. संबंधित मुलीनं शनिवारी सकाळी सहा ते सातच्या सुमारास भोजनालयाच्या ओट्यावर नायलॉन दोरीने गळफास घेत आयुष्याचा शेवट आहे. अनिता मनोहर भोये असं आत्महत्या केलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचं नाव आहेत. ती इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत होती. हेही वाचा-31 डिसेंबरची रात्र ठरली काळरात्र; पार्टीनंतर चौघांनी मित्राला टेरेसवरून फेकलं पीडित मुलीनं आत्महत्या केल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक अनिल सोनवणे यांना मिळताच, त्यांनी या घटनेची माहिती सुरगाणा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेत सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. संबंधित मृत विद्यार्थिनीवर शनिवारी दुपारी वाघ धोंड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. हेही वाचा- शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल; खोल दरीत भयावह अवस्थेत आढळला मृतदेह संबंधित मुलीनं नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण आश्रम शाळेत मन न रमल्यामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस चहुबाजूंनी या घटनेचा तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nashik, Suicide

    पुढील बातम्या