मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /''...राष्ट्रपती राजवट लागू शकते'', चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

''...राष्ट्रपती राजवट लागू शकते'', चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई, 27 डिसेंबर: भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू शकते, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलंय. राज्यपालांच्या (Governor Bhagat singh Koshyari) अधिकाराबाबत बोलू शकत नाही. राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार महाविकास आघाडीचा आहे, असंही ते म्हणालेत.

राज्यपालांनी दोनदा वेळ दिली होती. त्याचवेळी निवडणूक होऊ शकली असती. पण आता हे वेळ मागत आहे. हा राज्यपालांचा अपमान होता. त्यावर सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू शकते. पण मी त्यात जात नाही हा राज्यपालांचा अधिकार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. राज्यपाल हे स्वायत्त पद आहे, त्यांनी काय करायचं हे तेच ठरवतील, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक लांबणार? राज्यपालांनी मागितला वेळ

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या ( Assembly Speaker (Election) निमित्ताने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या (mva government) शिष्टमंडळाने काल राजभवनावर जाऊन राज्यपालांची (governor bhagat singh koshyari) भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली असून सही करण्याची विनंती केली आहे. पण राज्यपालांनी थोडा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

हेही वाचा-  Top 5 Cars 2021 : भारतीयांनी सर्वाधिक Google Search केल्या या Cars, पाहा डिटेल्स

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली आहे. काल महाविकास आघाडीचे नेते शिवसेना विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात राज्यपालांनी चर्चा केली.

राज्यपाल यांना विनंती करण्यासाठी आलो होतो. की त्यांनी निवडणूक कार्यक्रम पत्रिकेवर सही करून कार्यक्रम जाहीर करावा. पण त्यांना थोडा वेळ हवा आहे. त्यांना अभ्यास करायचा आहे. मला अपेक्षा आहे की ते उद्यापर्यंत या कार्यक्रमाला मान्यता देतील आणि निवडणूक होईल,उमेदवार काही मोठी बाब नाही. आमच्या पक्षात काय एका फोनवर उमेदवार ठरेल, अशी माहिती थोरात यांनी दिली.

हेही वाचा- खाण्यातूनही नशीब पालटतं, ग्रहांकडून असे मिळतात शुभ संकेत; विश्वास बसत नसेल तर करून पहा

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनाची पायरी चढली आहे.

First published:

Tags: Chandrakant patil