Home /News /lifestyle /

खाण्यातूनही नशीब पालटतं, ग्रहांकडून असे मिळतात शुभ संकेत; विश्वास बसत नसेल तर करून पहा

खाण्यातूनही नशीब पालटतं, ग्रहांकडून असे मिळतात शुभ संकेत; विश्वास बसत नसेल तर करून पहा

काही पदार्थ खाल्ल्यानं त्याच्याशी संबंधित ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात. यामुळं कुंडलीतील अशुभ ग्रहही चांगलं फळ देऊ लागतात. अन्न-ज्योतिषशास्त्रावरून आपल्याला माहीत होईल...

    नवी दिल्ली, 27 डिसेंबर : कुंडलीतील अशुभ ग्रहांना शांत करण्यासाठी रत्न, व्रत, पूजा, शांती असे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. परंतु उपायांची एक पद्धत अन्नाशी देखील संबंधित आहे. याला अन्न-ज्योतिष (food astrology) म्हणतात. फार कमी लोकांना याविषयी माहिती आहे. काही पदार्थ खाल्ल्यानं त्याच्याशी संबंधित ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात. यामुळं कुंडलीतील अशुभ ग्रहही चांगलं फळ देऊ लागतात. अन्न-ज्योतिषशास्त्रावरून आपल्याला माहीत होईल की, कोणत्या ग्रहापासून शुभ परिणाम मिळण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश (Astrology food method) केला पाहिजे. ग्रहानुसार अन्न खावे 'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार कुंडलीतील कमजोर ग्रहाशी संबंधित अन्नपदार्थ खाल्ल्यानं तो ग्रह बलवान होतो आणि शुभ परिणाम देऊ लागतो, असं झी न्यूजनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. सूर्य: सूर्य हा ग्रह यश, आत्मविश्वास, सन्मान आणि आरोग्य देतो. कुंडलीत सूर्य बलवान होण्यासाठी व्यक्तीनं आहारात गहू, आंबा, गूळ यांचा समावेश करावा. चंद्र : चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्रापासून शुभ फळ मिळण्यासाठी ऊस, साखर, दूध आणि दुधापासून बनवलेल्या मिठाई, आईस्क्रीम इत्यादी खावे. मंगळ : मंगळाच्या अशुभतेमुळे वैवाहिक जीवन, जमीन आणि संपत्तीच्या समस्या येतात. ते मजबूत करण्यासाठी आहारात गूळ, मसूर, डाळिंब, जव किंवा ओट्स आणि मध खावे. बुध : बुध ग्रह बुद्धी, व्यापार-उद्योग, आर्थिक स्थितीला प्रभावित करतो. या बाबींशी संबंधित अशुभ अनुभव किंवा परिणाम वाट्याला येत असल्यास वाटाणे, जव किंवा ओट्स, कुळपी, हिरवी कडधान्यं, मूग, हिरव्या भाज्या खाल्ल्यास लवकरच फायदे मिळू लागतात. गुरु: ज्योतिष शास्त्रात गुरु हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. जर हा ग्रह बलवान असेल तर व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात शुभ फळं मिळतात. या ग्रहापासून चांगले परिणाम मिळविण्यासाठी हरभरा, हरभरा डाळ, बेसन, मका, केळी, हळद, खडे मीठ, पिवळी कडधान्यं आणि फळं खावीत. शुक्र : शुक्र ग्रह भौतिक सुख, सौंदर्य, ऐश्वर्य, सुखी वैवाहिक जीवनाचा कारक आहे. यापासून शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी त्रिफळा, मसूर, साखर, कमलगट्टा, खडीसाखर, मुळा आणि पांढरे बीट खावे. हे वाचा - YEAR ENDING OFFERS: कार घ्यायचा विचार करताय तर लगेच बूक करा; मिळतोय भरघोस Discount शनि : शनि ग्रह अशुभ असेल तर त्याचा शरीर, मन आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. चांगल्या जीवनासाठी शनीची कृपा आवश्यक आहे. यासाठी तीळ, उडीद, काळी मिरी, शेंगदाणा तेल, लोणचं, लवंग, तमालपत्र आणि काळं मीठ यांचं सेवन करणं खूप फायदेशीर आहे. राहू आणि केतू : राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी तुमच्या आहारात उडीद, तीळ आणि मोहरीचा समावेश करा. हे वाचा - त्वचेपासून ते केसांच्याही आरोग्यासाठी गुणकारी आहेत कडुनिंबाची पाने; जाणून घ्या या पद्धती दररोज या गोष्टी खा याशिवाय आठवड्याच्या सातही दिवशी त्या-त्या विशिष्ट दिवसाशी संबंधित पदार्थ खाणंदेखील खूप फायदेशीर आहे. उदाहरणार्थ, रविवारी हरभरे/चणे, सोमवारी खीर किंवा दूध, मंगळवारी चुरमा, शिरा, खीर किंवा हलवा, बुधवारी हिरव्या भाज्या, गुरुवारी हरभरा डाळ किंवा बेसन, शुक्रवारी गोड दही आणि शनिवारी उडीद खाल्ल्यानं प्रत्येक ग्रहाचा आशीर्वाद मिळतो. यामुळं जीवनातील संकटं दूर होतात आणि सर्व ग्रह शुभ फल देतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती विविध स्त्रोतातून मिळवलेली आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या