मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /"किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही" राष्ट्रपतींच्या दौऱ्यापूर्वी शिवप्रेमींनी दर्शवला विरोध

"किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही" राष्ट्रपतींच्या दौऱ्यापूर्वी शिवप्रेमींनी दर्शवला विरोध

President Ram Nath Kovind to visit Raigad fort: राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या सहा डिसेंबर रोजी रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत.

President Ram Nath Kovind to visit Raigad fort: राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या सहा डिसेंबर रोजी रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत.

President Ram Nath Kovind to visit Raigad fort: राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या सहा डिसेंबर रोजी रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत.

रायगड, 3 डिसेंबर : शिवछत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) 6 डिसेंबर रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर (Raigad Fort) येत आहेत. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे. मात्र आता यावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही पण किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे.

पूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिपॅड होते. या ठिकाणी हॅलिकॉप्टर उतरताना अगर उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धूळ, माती, केर कचरा उडत असे. ही धूळ, माती होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने 1996 ला येथे उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढुन टाकण्यात आला होता. सुमारे 25 वर्षांनंतर शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत असल्याने शिवप्रेमींकडून विरोध केला जात आहे.

3 ते 7 डिसेंबर दरम्यान नागरिकांसाठी बंदी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे किल्ले रायगडावर भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. दरम्यान राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त तीन ते सात डिसेंबर या कालावधीत किल्ले रायगडावर नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. किल्ले रायगड, रायगड रोप-वे, रायगड किल्ल्याच्या आजुबाजूकडील परिसर हे तसेच माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड रस्ता व नातेगाव ते पाचाड बाजुकडील रस्ता सुद्धा सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांकरीता बंद करण्यात येणार आहे.

वाचा : कडाक्याच्या थंडीत गारठून शिर्डीत दोघांचा मृत्यू 

यापूर्वी राष्ट्पती आणि पंतप्रदानांची रायगडाला भेट

स्वतंत्र भारताच्या इतिहासात राष्ट्रपती व पंतप्रधान अशा दोन्ही पदांवरील मान्यवरांनी भेट दिलेला रायगड हा एकमेव असा किल्ला आहे. या आधी 1980 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300 व्या पुण्यतिथी दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी दुर्गराज रायगडवर आल्या होत्या. 1985 साली राजसदरेवर उभारण्यात आलेल्या मेघडंबरीचे अनावरण करण्यासाठी माननीय राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर आले होते.

3 एप्रिल 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली होती. यावेळी महाराजांची प्रतिमा असलेले 2 रुपये किंमतीचे नाणे भारत सरकारच्या वतीने काढण्यात आले होते.

वाचा : एकही दरवाजा नसलेलं अन् 24 तास सुरू असलेलं अनोखं दुकान; दुकानदार कधीही मागत नाही पैसे!

राष्ट्रपती कोविंद स्वतः शिवभक्त असून 2018 साली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने राजधानी दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याच सोहळ्यात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी माननीय राष्ट्रपती महोदयांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट म्हणून दिले होते. त्यापूर्वी राष्ट्रपती भवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याने सदरचे तैलचित्र राष्ट्रपती भवनामध्ये त्यांनी अत्यंत अभिमानाने लावलेले आहे.

First published:

Tags: Chhatrapati shivaji maharaj, President ramnath kovind, Raigad