Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

एकही दरवाजा नसलेलं अन् 24 तास सुरू असलेलं अनोखं दुकान; दुकानदार कधीही मागत नाही पैसे!

एकही दरवाजा नसलेलं अन् 24 तास सुरू असलेलं अनोखं दुकान; दुकानदार कधीही मागत नाही पैसे!

kirana store

kirana store

गुजरातमधल्या (Gujarat) छोटा उदयपूर जिल्ह्यातल्या केवडी गावात (Kevdi Village) एक असं अनोखं दुकान (unique shop) आहे, ज्यात दुकानदार नसला तरी ग्राहकांना खरेदी करता येते.

उदयपुर, 3 डिसेंबर:  आपण प्रत्येक जण काही ना काही खरेदी करण्यासाठी दुकानात जातो. दुकानात दुकानदारच (Shopkeeper) नसेल तर आपल्याला पाहिजे ती वस्तू घेता येणार नाही, हे नक्की. तरीही आपण वस्तू घेण्याचा प्रयत्न केला, तर दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत (CCTV) आपली चोर म्हणून नोंद होईल. म्हणून आपल्याजवळ दुकानदाराची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. मात्र, गुजरातमधल्या (Gujarat) छोटा उदयपूर जिल्ह्यातल्या केवडी गावात (Kevdi Village) एक असं अनोखं दुकान (unique shop) आहे, ज्यात दुकानदार नसला तरी ग्राहकांना खरेदी करता येते. विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षांपासून हे दुकान एकदाही बंद करण्यात आलेलं नाही. सईदभाई नावाच्या व्यक्तीचं हे दुकान आहे. 'दी बेटर इंडिया'ने या अनोख्या दुकानदाराची कहाणी प्रसिद्ध केली आहे.

सईदभाई (Saidbhai) यांनी वयाच्या अठराव्या वर्षी हे दुकान सुरू केलं आहे. त्यांचे वडील एक व्यापारी होते. गावात त्यांना 'उभा सेठ' या नावानं ओळखलं जात असे. आता त्याच नावानं लोक सईदभाईंना हाक मारतात. त्यांच्या दुकानाचं नावदेखील ‘उभा सेठ की दुकान’ असंच आहे. ते कधीही आपल्या दुकानात आलेल्या ग्राहकाकडे पैसे मागत नाहीत. सईदभाई दुकानात असोत किंवा नसोत, ग्राहक येऊन आपल्याला पाहिजे ती वस्तू घेतो आणि काउंटरवर पैसे ठेवून जातो. विशेष म्हणजे हे अनोखं दुकान वर्षाचे 365 दिवस अहोरात्र उघडंच असतं. दुकानाचे मालक असलेले सईदभाई म्हणतात, की त्यांचा गावातल्या नागरिकांवर विश्वास आहे. ते त्यांना कधीही धोका देणार नाहीत. त्यामुळे ते 24 तास दुकान सताड उघडं ठेवतात.

जेव्हा सईदभाईंनी हे दुकान सुरू केलं होतं, तेव्हा नागरिकांच्या मनात काही प्रमाणात शंका खील होती. कारण, असा पैसे न मागणारा आणि दुकान कायम उघडं ठेवणारा दुकानदार त्यांनी पहिल्यांदाच पाहिला होता; मात्र सईदभाईंनी घरोघरी जाऊन नागरिकांना विश्वास दिला, की दुकानात काहीही चुकीची गोष्ट नाही. गावातले नागरिक कधीही येऊन त्यांच्या गरजेच्या वस्तू घेऊन जाऊ शकतात. हळूहळू नागरिकांच्या मनातल्या सर्व शंका दूर झाल्या. त्यांच्या या अनोख्या दुकानात कोल्ड्रिंक्स, दुधापासून ते किराणा सामानापर्यंत सर्व काही मिळतं. याशिवाय पाण्याच्या टाक्या, दरवाजे, फरशा, कटलरी, हार्डवेअर आदी वस्तूही दुकानात आहेत. नागरिक त्यांच्या गरजेनुसार येऊन सामान घेऊन पैसे ठेवतात.

सईदभाईंच्या दुकानाला एकही दरवाजा नाही. तरीदेखील या ठिकाणावरून अद्याप काहीही चोरीला गेलेलं नाही. चार वर्षांपूर्वी दुकानातून पहिल्यांदा एक बॅटरी उचलून नेण्यात आली होती. ही गोष्ट गावकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं होतं; पण दुकानमालकानं तक्रार केली नाही. 'चोरानं पैसे चोरले नाहीत याचा मला आनंद झाला. कदाचित त्याला बॅटरीची गरज असेल, म्हणून त्याने फक्त बॅटरी घेतली,' अशी प्रतिक्रिया सईदभाईंनी दिली होती.

सईदभाईंचं दुकान केवडी गावात असलं, तरी ते त्या ठिकाणी राहत नाहीत. सुरुवातीला ते एकटे गावामध्ये राहत होते; मात्र वयाच्या 27व्या वर्षी लग्न केल्यानंतर त्यांनी जवळपास 13 वर्षं गोध्रातून (Godhra) अपडाउन केलं. आता गेल्या 17 वर्षांपासून ते बडोद्यात वास्तव्याला आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. त्यातला एक पायलट आहे, तर दुसरा आपलं शिक्षण पूर्ण करत आहे.

कुठलाही व्यवसाय विश्वासावर टिकून राहतो, असं सईदभाईंचं ठाम मत आहे. याच विश्वासाच्या बळावर गेल्या 30 वर्षांपासून ते केवडी गावात दुकान चालवत आहेत.

First published:

Tags: Gujrat, Shopping