रायगड, 1 जून : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी रायगडावर सुरू आहे. येत्या दोन जूनला तिथीप्रमाणे तर सहा जूनला तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तिथीप्रमाणे उद्या शिवराज्याभिषेक सोहळा होणार असून, आज गणेश पूजन करण्यात आलं. विशेष म्हणजे राज दरबारमध्ये 350 वर्षांपूर्वी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता. त्यावेळी असलेल्या दरबाराचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला आहे. सोहळ्यासााठी शिवभक्तांनी रायगडावर गर्दी केली आहे. शिवराज्याभिषेकासाठी चांदीची पालखी वापरली जाणार असून, तीचं पूजन देखील आज करण्यात आलं आहे. तिथीप्रमाणे साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे कार्यक्रम एक जून रोजी गडदेवता शिर्काई पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर छत्रपती शंभू महाराज जयंती उत्सव, गंगासागर पूजन, संध्याकाळी पारंपरिक गोंधळ, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर दोन जूनला सकाळी 7 वाजता ध्वजारोहन सोहळा, सकाळी 9 वाजता शिवराज्याभिषेक सोहळा, 10.30 वाजता श्री शिवसन्मान सोहळा आणि 11 वाजता शिवपालखी सोहळा होणार आहे. शिवराज्याभिषेकासाठी चांदीची पालखी वापरली जाणार असून, तीचं पूजन देखील आज करण्यात आलं आहे. शिरूर लोकसभेवर राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा, कोल्हेंची जागा धोक्यात? गागाभट्ट यांचे सतरावे वंशज करणार शिवराज्याभिषेकाचा विधी गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज हा विधी करणार आहेत. या कार्यक्रमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







