जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / शिरूर लोकसभेवर राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याचा दावा, कोल्हेंची जागा धोक्यात?

शिरूर लोकसभेवर राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याचा दावा, कोल्हेंची जागा धोक्यात?

शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. शिरूर मतदारसंघावर एकाचवेळी राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांकडून दावा करण्यात आला आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 1 जून : महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून लोकसभेच्या 18 जागांवर दावा करण्यात आला आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरून देखील मविआमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. असाच वाद आता शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. विलास लांडे इच्छूक   भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी आतापासूनच या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला सुटणार हे अद्याप ठरलेलं नाहीये. असं असतानाही राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र दुसरीकडे लांडे यांनी देखील याच मतदारसंघासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचं पहायला मिळत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

निवडणूक लढवण्याचे संकेत  वाढदिवसाचं औचित्य साधत विलास लांडे यांनी मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरमधून त्यांनी  शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर हे नव आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मविआमध्ये ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार? आणि जर राष्ट्रवादीच्या वाट्याला हा मतदारसंघ आता तर तिकीट लांडेंना मिळणार की कोल्हेंना हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात