मुंबई, 28 जुलै, प्रणाली कापसे : मुंबईत आता सप्टेंबरपासून प्रीपेड विजेचं मीटर बसवलं जाणार आहे. याचा फटका हा वीज ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. कारण प्रीपेड वीज मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना वीज वापरण्यापूर्वीच पैसे भरावे लागणार आहेत. मुंबई शहर परिसरात बेस्टचे तब्बल 10 लाख 50 हजार ग्राहक आहेत, या ग्राहकांसाठी आता बेस्टकडून प्रीपेड विजेचं मीटर लावण्यासाठीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून अशाप्रकारचे मीटर लावले जाणार आहेत. एकूण खर्च किती? मिळत असलेल्या माहितीनुसार बेस्ट प्रशासनानं याबाबतचं वर्क ऑर्डर दिलं असून, सप्टेंबर महिन्यापासून मिटर लावण्याचं काम सुरू केलं जाणार आहे. मुंबई शहर परिसरात बेस्टचे तब्बल दहा लाख 50 हजार इतके ग्राहक आहेत. 9500 रुपये प्रती मीटर इतका खर्च बेस्ट प्रशासनाला नवीन मीटर उभारणीसाठी येणार आहे. या खर्चापैकी 1300 रुपयांची सबसिडी केंद्रकडून भेटणार आहे. तर उर्वरीत खर्च बेस्ट प्रशासनालाच करावा लागणार आहे. काँग्रेसकडून विरोध दरम्यान बेस्टच्या या उपक्रमाला काँग्रेसकडून विरोध करण्यात आला आहे. आधीच तोट्यात चालणाऱ्या बेस्टला हा भार सोसणार नाही. शिवाय हा निर्णय घेताना नागरिकांची मतं मागवली नसल्याचा आरोपही काँग्रेसकडून होत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.