• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • हृदयद्रावक! जन्माआधीच बाळाचा मृत्यू; विषारी सापाच्या दंशाने गरोदर मातेचा मृत्यू

हृदयद्रावक! जन्माआधीच बाळाचा मृत्यू; विषारी सापाच्या दंशाने गरोदर मातेचा मृत्यू

Snake Bite News: विषारी सापाने दंश केल्याने जव्हार येथील एका गरोदर महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

 • Share this:
  जव्हार, 25 ऑक्टोबर: ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका गरोदर महिलेला विषारी सापाने दंश केला (Snake bite to pregnant woman) आहे. वेळेवर उपचार आणि वाहन न मिळाल्याने संबंधित महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत (mother and her unborn child dead) झाला आहे. ही घटना उघडकीस येताच, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. संबंधित घटना ठाणे जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील पिंपळशेत पागीपाडा गावातील आहे. तर माया चौधरी असं सर्पदंशाने मृत पावलेल्या 20 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. घटनेच्या दिवशी मृत माया चौधरी आपल्या शेतात भर दुपारी काम करत होत्या. दरम्यान उन्हाचे चटके बसत असल्याने, त्या शेतातील एका झाडाखाली सावलीला येऊन बसल्या. थोडावेळ विसावा घेण्यासाठी झाडाखाली आलेल्या माया यांना एका विषारी सापाने दंश केला. हेही वाचा-गळा दाबून केला पत्नीचा खून, मग गळफास घेत केली आत्महत्या सापाने दंश करताच माया यांनी मदतीसाठी लोकांना हाका मारल्या. आसपास शेतात काम करणारे काही शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माया यांना त्वरित चांभारशेत येथील आरोग्य केंद्रात नेलं, पण याठिकाणी आरोग्य केंद्रात केवळ एकच महिला शिपाई कर्मचारी उपस्थित होती. तसेच येथे रुग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती. त्यामुळे सर्पदंश झालेल्या माया यांना बराच वेळ ताटकळत बसावं लागलं. हेही वाचा-3 महिन्याच्या बहिणीचा गळा दाबून अल्पवयीन भावाने मृतदेह पिशवीत टाकून नदीत फेकला काही वेळाने एका खाजगी वाहनाने माया यांना जव्हार येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेत असताना वाटेतच माया यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समोर येताच परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. एका गरोदर महिलेला सापाने दंश केल्याने गावात शोककळा पसरली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: