मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

गळा दाबून केला पत्नीचा खून, मग गळफास घेत केली आत्महत्या

गळा दाबून केला पत्नीचा खून, मग गळफास घेत केली आत्महत्या

पतीने पत्नीचा गळा (Husband kills wife and commits suicide) दाबून हत्या केल्याची आणि नंतर आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : पतीने पत्नीचा गळा (Husband kills wife and commits suicide) दाबून हत्या केल्याची आणि नंतर आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीने अगोदर पत्नीची गळा दाबून हत्या केली (Murdered and commit suicide)आणि त्यानंतर स्वतःला गळफास लावत आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला असून पोलीस घटनेमागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशी घडली घटना

दिल्लीतील न्यू अशोक नगर भागात राहणाऱ्या दांपत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होत होते. या जोडप्याला तीन मुलं आहेत. घटनेच्या दिवशी पतीनं पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. काही कारणावरून झालेल्या वादानंतर आक्रमक झालेल्या पतीनं पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर भावनेच्या भरात स्वतः गळफास लावला आणि आपली जीवनयात्रा संपवली.

मुलांना बसला धक्का

दिल्लीत राहणाऱ्या धर्मंद्र आणि सोनी या पती पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होते. मात्र त्याचा परिणाम दोघांचाही जीव जाण्यात होईल, अशी अपेक्षा मुलांनी कधीच केली नव्हती. घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं, याची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी धर्मेंद्र आणि सोनी या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिले आहेत. या घटनेमागे तात्कालिक राग आणि भांडणं हेच कारण आहे की इतर काही कारणांमुळे धर्मेंद्रनं हा निर्णय घेतला, याचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच या प्रकरणातील गूढ उलगडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अचानक आई आणि वडील यांचं छत्र हरपल्यामुळे मुलांना जबर धक्का बसला आहे.

First published:

Tags: Crime, Delhi, Murder