अहमदनगर, 03 नोव्हेंबर : प्रतिक काळे आत्महत्या प्रकरणावरून (pratik kale suicide case) महाविकास आघाडी सरकार (mva government) आणि भाजपमध्ये (bjp) पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. 'प्रतिक काळेची आत्महत्या दुर्देवी आहे. तो काही माझा स्वीय सहाय्यक नव्हता पण विरोधक केवळ राजकीय हेतूने आरोप करत आहे, त्यांनी एक तरी पुरावा द्यावा' असं म्हणत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (shankarrao gadakh) यांनी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य यांना फटकारून काढले.
प्रतिक काळे आत्महत्या प्रकरणावर शंकराव गडाख यांनी नी आपली भूमिका मांडत भाजप नेत्यांचा खडेबोल सुनावले आहे.
'दंत महाविद्यालियातील कर्मचारी प्रतिक काळे याने 30 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. प्रतिक हा माझे बंधू प्रशांत गडाख यांच्या संस्थेतील कॉम्प्युटर ऑपरेटर होतो, तो माझा स्विय सहाय्यक नव्हता, असा खुलासा शंकरराव गडाख यांनी केला.
सिनेमांच्या जादुई दुनियेत करिअर करायचंय? मग 'हे' कोर्सेस करून मिळवा एन्ट्री
तसंच, विरोधकांनी एक तरी पुरावा द्यावा की यात दोषी आहे. मी दोषी असेल तर मला हवी ती शिक्षा द्या. माझ्याकडून कोणताही दबाव नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं म्हणत शंकरराव गडाख यांनी सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.
'माझ्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. केशव उपाध्याय यांनी केलेले आरोप राजकीय हेतूने आहेत. सदर प्रकरणाची कोणत्याही समितीने सखोल चौकशी करावी आणि जर दोषी आढळून आलो तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार असल्याचंही शंकरराव गडाख यांनी म्हटलंय.
काय म्हणाले होते केशव उपाध्य?
प्रतीक काळेने या क्लिपमध्ये सांगितले आहे की माझा मानसिक छळ करत आहेत. त्याने दहा नावं घेतली आहेत. पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल केले पण तीन जणांवर अळी मिळी गुपचिळी आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. प्रतिकला न्याय मिळणार आहे का हा पहिला प्रश्न आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा. जर ते राजीनामा देणार नसतील तर त्यांना पदावरून काढा. प्रतीक काळे याच्यावर आत्महत्येची वेळ का आली याची चौकशी व्हायला पाहिजे' अशी मागणी यावेळी केशव उपाध्ये यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
अहमदनगरमधील दंत महाविद्यालयात प्रतीक काळे हा तरुण काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉर्ड करुन ते सोशल मीडियात पोस्ट केले होते. जलसंधारणंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या अधिपत्याखाली हे दंत महाविद्यालय आहे.
BREAKING : परमबीर सिंग अखेर प्रकटले, अनिल देशमुखांबद्दल केला मोठा खुलासा
प्रतीक काळे याच्या आत्महत्येनंतर त्याच्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या प्रकरणी अहमदनगरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.