मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : परमबीर सिंग अखेर प्रकटले, अनिल देशमुखांबद्दल केला मोठा खुलासा

BREAKING : परमबीर सिंग अखेर प्रकटले, अनिल देशमुखांबद्दल केला मोठा खुलासा

'अनिल देशमुखांविरोधात आता आपल्याजवळ देण्यासारखे काहीही पुरावे शिल्लक नाहीत' असा खुलासा परमबीर सिंग यांनी केला आहे.

'अनिल देशमुखांविरोधात आता आपल्याजवळ देण्यासारखे काहीही पुरावे शिल्लक नाहीत' असा खुलासा परमबीर सिंग यांनी केला आहे.

'अनिल देशमुखांविरोधात आता आपल्याजवळ देण्यासारखे काहीही पुरावे शिल्लक नाहीत' असा खुलासा परमबीर सिंग यांनी केला आहे.

मुंबई, 03 नोव्हेंबर : 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांना अटक झाली असून कोठडीत रवानगी झाली आहे. तर दुसरीकडे बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parmabir singh) अचानक प्रकटले आहे. 'अनिल देशमुखांविरोधात आता आपल्याजवळ देण्यासारखे काहीही पुरावे शिल्लक नाहीत' असा खुलासा परमबीर सिंग यांनी केला आहे.

100 कोटी वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल (Retired Justice Kailash Uttamchand Chandiwal) यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीकडून परमबीर सिंग यांची चौकशी सुरू आहे. पण, आतापर्यंत एकदाही परमबीर सिंग हे चौकशीला हजर झाले नाही. अखेर आता परमबीर सिंग यांनी चांदिवाल आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

अनिल देशमुख यांच्यावर मी जे काही आरोप केले होते, आता त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे आपल्याकडे शिल्लक नाही, असा खुलासा सिंग यांनी केला आहे. सिंग यांनी 13 तारखेलाच हे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. अनिल देशमुख यांना अटक आणि कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेले परमबीर सिंग हे सीबीआयने केलेल्या तपासातही  हजर न राहिले नाही. त्यामुळे परमबीर सिंग बेपत्ता झाल्याची चर्चा अधिक वेगाने वाढू लागली. दरम्यान, त्यांचे वकील चंद्रचूड सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. परमबीर सिंग यांनी स्वतः तयार केलेले पॉवर ऑफ अटर्नी या उपक्रमाशी संलग्न आहेत. यावरून परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याचे सूचित होते. परमबीर सिंग यांनी ही पॉवर ऑफ अटर्नी चंदीगडमध्ये तयार केली आहे. कागदावर पत्ता चंदीगड असा दिला आहे. यामुळे त्याच्या चंदीगडमध्ये असल्याचा संशय बळकट झाला आहे.

First published: