मुंबई, 12 जानेवारी : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी तब्बल अडिच तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं होतं. अखेर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रत्येक भेट ही राजकीय नसते असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपसोबतच्या पक्षांना पाठिंबा देणार नाही. मात्र शिंदे गटाने भाजपासोबतची युती तोडली तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं आंबेडकर यांनी? प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा केला आहे. प्रत्येक भेट ही राजकीय नसते. इंदू मिलमधील स्मारकासंदर्भात मी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो. आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपसोबत आम्ही सध्या युती करणार नाहीत. भाजपसोबत असलेल्या पक्षांना पाठिंबा देखील देणार नाहीत. मात्र शिंदे गट जर भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडला तर पाठिंबा देण्याचा विचार करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : शिंदे गट, प्रकाश आंबेडकरांची युती होणार का?, राऊतांचा मोठा खुलासा म्हणाले… ठाकरे गटाच्या युतीवर प्रतिक्रिया दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना ठाकरे गटासोबतच्या युतीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही तयार आहोत. आता उद्धव ठाकरे यांनी आपली युतीबाबतची भूमिका जाहीर करावी. उद्धव ठाकरे यांनी निवडणुका एकत्र लढवण्याबाबत जाहीर करावं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने आमचा खिमा केला, आम्ही भाजपसोबत गेलो असतो तर आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीचा खिमा केला असता असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







