अरविंद बनसोड मर्डर केस: प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर सणसणीत आरोप

अरविंद बनसोड मर्डर केस: प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर सणसणीत आरोप

अरविंद बनसोड हत्याप्रकरणी पोलिसांनी राजकीय दबावापोटी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून घेतला.

  • Share this:

नागपूर, 18 जून: थंडी पवनी येथे अरविंद बनसोड याची हत्या करण्यात आली होती. 27 मे रोजी झालेल्या या हत्याप्रकरणी पोलिसांनी राजकीय दबावापोटी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून घेतला. मंत्री नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमूख अरविंदच्या कुटुंबीयांवर दबाव आणत आहेत, असा सणसणीत आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

हेही वाचा...कोरोनाचं सावट! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सार्वजनिक गणेश मंडळांना केलं महत्त्वाचं अपील

या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांवर कारवाई करून अरविंद बनसोड हत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवावं, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अरविंद बनसोड यांच्या कुटुंबाला मिळालेली मदत देखील तुटपुंजी असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

अरविंद बनसोड हत्याप्रकरणी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शिवाय आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी वकिलांशीही भेटून चर्चा केली.

उच्चशिक्षित अरविंद बनसोड यांची हत्या 27 मे रोजी नागपुरमध्ये थंडी पवनी येथे करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच पोलिसांची भूमिकाही संशयास्पद होती. राज्यभर गाजलेल्या या हत्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आवाज उठवला.

हेही वाचा... भारतात या शहरात स्वस्त मिळतंय पेट्रोल, मुंबईपेक्षा प्रति लिटर 19 रुपयांनी दर कमी

राज्यभर निषेध करण्यात आले. सरकारला इशारा देण्यात आल्यानंतर या प्रकरणात कारवाई करीत अटकसत्र सुरू करण्यात आले. आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता. यावेळी अरविंद बनसोडचे कुटुंब या ठिकाणी उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या आवारातच अरविंदच्या कुटुंबीयांची आणि वकिलांची भेट घेऊन चर्चा केली. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी काय प्रयत्न करता येतील, ते केले जातील असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

First published: June 18, 2020, 4:47 PM IST

ताज्या बातम्या