शक्तीशाली स्फोटानं सांगली हादरलं, एक ठार तीन गंभीर; अनेक वाहनं जळून खाक

शक्तीशाली स्फोटानं सांगली हादरलं, एक ठार तीन गंभीर; अनेक वाहनं जळून खाक

तासगावपासून जवळच असलेल्या बस्तवडे गावात ही घटना घडली आहे.

  • Share this:

सांगली, 6 डिसेंबर: सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगावमध्ये (Tasgaon) जिलेटीन कांड्याचा भीषण स्फोट (Blast) होऊन एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले असून दोन वाहनं जळून खाक झाल्याचं समजते.

तासगावपासून जवळच असलेल्या बस्तवडे गावात दुपारी चार वाजेच्या ही घटना घडली आहे. डोंगर फोडण्याचा काम सुरू असताना जिलेटीन कांड्याचा स्फोट झाला. घटनास्थळी अग्निशमन गाड्या आणि पोलीस दाखल झाले आहेत.

हेही वाचा...पुण्यात बर्थडे पार्टीत तिघांनी केली 'गंदी बात', महिलेसमोरच विवस्त्र अवस्थेत केला डान्स!

मिळालेली माहिती अशी की, तासगावच्या पूर्व भागात बस्तवडे गावाजवळील डोंगर फोडताना भीषण स्फोट झाला. डोंगर फोडून सपाटीकरणाचं काम सुरू असताना जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाला. बस्तवडे गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत. तर घटनास्थळी 7 ते 8 आणखी कामगार असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अचानक ट्रक पेटल्यामुळे शेजारी असलेल्या कॉंप्रेसर गाडीला आग लागली. आग भीषण असल्यानं काँप्रेसरचा ब्लास्ट झाला. त्यापाठोपाठ दोन वाहन जळून खाक झालीत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून विझवण्याचं काम सुरू आहे.

स्फोटा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. स्फोट नेमका कुठे झाला हे नागरिकांन समजत नव्हतं. मात्र धुराचे लोळ उठले. त्या दिशेने पोलीस आणि अग्मिशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.  स्फोटात एक जण जागेवरच ठार झाला असून त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला आहे. तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

असा घडला स्फोट...

डोंगर फोडण्यासाठी जिलटीन कांडयांचा वापर करण्यात येत होता. ज्या ठिकाणी जिलेटीन कांड्या ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी एक ट्रक उभा होता. ट्रक अचानक पेटला आणि त्याठिकाणी असणारी जिलेटिनच्या कांडयांचा भीषण स्फोट झाला. याठिकाणी काम करणारा एक कामगार जागीच ठार झाला. 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील ठार झालेल्या कामगाराचे मृतदेहाचे अवयव छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 6, 2020, 6:27 PM IST

ताज्या बातम्या