जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एका मांजराने उडवली पिंपरी चिंचवडकरांची झोप, 65 हजार वीज ग्राहकांना बसला 'शॉक'!

एका मांजराने उडवली पिंपरी चिंचवडकरांची झोप, 65 हजार वीज ग्राहकांना बसला 'शॉक'!

पिंपरी चिंचवडमध्ये एका मांजराने (cat) तब्बल सहा तास वीज पुरवठा खंडीत (Power outage in Pimpri Chinchwad) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये एका मांजराने (cat) तब्बल सहा तास वीज पुरवठा खंडीत (Power outage in Pimpri Chinchwad) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये एका मांजराने (cat) तब्बल सहा तास वीज पुरवठा खंडीत (Power outage in Pimpri Chinchwad) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी चिंचवड, 23 मार्च : उन्हाळ्याचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच जर वीज गेली तर प्रचंड उकाडा सहन करावा लागतो. पण, पिंपरी चिंचवडमध्ये एका मांजराने (cat) तब्बल सहा तास वीज पुरवठा खंडीत (Power outage in Pimpri Chinchwad) केल्याचा प्रकार समोर आला आहे. महापारेषणच्या विद्युत पुरवठा केंद्रात मांजर घुसल्याने शॉट सर्किट झाल्याने 6 तास वीज पुरवठा बंद पडला. त्यामुळे  65 हजार ग्राहकांना फटका बसला. तुर्तास वीज पुरवठा सुरू झाला असला तरी लोडशेडिंगचे संकट कायम आहे. महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे भोसरी व आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारी 12 वाजेपर्यंत खंडीत झाला होता. अखेर सहा तासच्या मेहेनती नंतर भोसरित विद्युत पुरवठा पुनहा एकदा सुरळीत सुरू झाला आहे. ( मोठी घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता साकारणार स्वा. सावरकरांची भूमिका ) भोसरीमधील गवळी माथा येथे महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रामध्ये १०० एमव्हीए क्षमतेचे दोन व ७५ एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र त्यातील १०० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण २६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र यातील १०० एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास बिघाड झाला. ( हिंदू मंदिरांच्या परिसरात मुस्लिमांच्या स्टॉलला बंदी, हिजाबनंतर नवा वाद ) त्यामुळे महावितरणच्या एकूण १० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील ४५०० औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. काय घडलं नेमकं? पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एक मांजर 22 केव्ही क्षमतेच्यावर मांजर चढलं होतं. मांजराचा तारेशी संपर्क झाल्यामुळे अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि वीज पुरवठा हा खंडीत झाला होता. दरम्यान, भोसरी परिसरातील वीज पुरवठा शनिवारपर्यंत विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.  मांजर घुसल्याने झालेल्या  अपघातात ट्रांसफार्मरचे मोठे नुकसान झाले आहे, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात बराच वेळ लागू शकतो त्यामुळे दुसरा ट्रांसफार्मर बसविण्यासाठीचे पर्यंत सुरू आहे. मात्र दुसरा ट्रांसफार्मर बसविल्यानंतर त्यातून सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी शनिवार ते रविवारपर्यंतचा काळ लागू शकतो दरम्यानच्या काळात लोडशेडिंग केला जाऊ शकतो, असं टेस्टिंग सर्कल महापारेषाणच्या अधिकारी  जयंत कुलकर्णी यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात