जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मोठी घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता साकारणार स्वा. सावरकरांची भूमिका

मोठी घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता साकारणार स्वा. सावरकरांची भूमिका

मोठी घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता साकारणार स्वा. सावरकरांची भूमिका

लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित चित्रपट सर्वांच्या भेटीला येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 मार्च-   आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये   (Bollywood)  आपली एक खास ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा   (Randeep Hooda)  होय. रणदीपने आजपर्यंत अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु आता त्याचा चांगलाच कस लागणार आहे. कारण हा अभिनेता एका ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. रणदीप हुड्डा लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘सरबजीत’च्या प्रचंड यशानंतर, निर्माता संदीप सिंह पुन्हा एकदा अभिनेता रणदीप हुडासोबत त्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या महत्त्वाकांक्षी चित्रपटामध्ये एकत्र काम करणार आहेत. निर्माते आनंद पंडित आणि संदीप सिंह यांनी अखेर रणदीपला स्वातंत्र्यवीर सावरकर या त्यांच्या चित्रपटात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अनसंग हिरो म्हणून कास्ट केलं आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचं शूटिंग या वर्षी जून 2022 पासून सुरू होणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहातील विविध ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण केलं जाणार आहे. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या प्रकारे प्रकाश टाकणार आहे. वीर सावरकरांच्या या कधीही न समोर आलेल्या कथेचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठमोळे दिग्दर्शक महेश व्ही मांजरेकर करणार आहेत. आपल्याला मिळालेल्या इतक्या मोठ्या संधीबाबत बोलताना रणदीप हुड्डा म्हणाला, ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात प्रभावशाली तरीही अनेकांना विसर पडलेला नायक असणाऱ्या सावरकरांच्या भूमिकेसाठी आपली निवड झाल्याबद्दल आनंद होत आहे. रणदीप म्हणतो, “असे अनेक नायक आहेत ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपली विशेष भूमिका बजावली आहे. मात्र, प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळालेले नाहीत. विनायक दामोदर सावरकर हे अशाच नायकांपैकी एक आहेत. ते अत्यंत प्रभावशाली आहेत आणि त्यांची कथा सांगायलाच हवी’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात