बेळगाव, 12 मार्च : संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची (Corona Virus) भीती वाढतच चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध अफवाही पसरवल्या जात आहे. कोंबड्यांमधून कोरोना व्हायरस पसरतो अशी अफवा लोकांमध्ये पसरल्यामुळे नागरिकांनी चिकन खाणे बंद केले आहे. याचा फटका पोल्ट्रीधारकांना होत आहे. कर्नाटकच्या (Karnataka) बेळगाव (belgaum) आणि कोलार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कोंबड्या जिवंत गाडल्यात. याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
अनेक ठिकाणी पोल्ट्री धारक काम बंद करीत असल्याची बाबही समोर आली आहे. सीमाभागातल्या म्हणजेच बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग चिक्कोडी या भागात तर पोल्ट्री धारकांनी विनामूल्य कोंबडी वाटप केलं आहे.
कोरोना व्हायरसचा मोठा फटका पोल्ट्री धारकांना बसला आहे. सीमाभागातल्या म्हणजेच बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग चिक्कोडी या भागात तर पोल्ट्री धारकांनी विनामूल्य कोंबडी वाटप केलं pic.twitter.com/iOUwJiTCOk
विशेष म्हणजे विनामूल्या कोंबड्या घेण्यासाठी या भागात नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. या भागांमध्ये दहा ते बारा गाड्यांमधून जवळपास चार हजारहून अधिक पक्षी आणण्यात आले होते आणि त्यांचे मोफत वाटप या भागात करण्यात आलं. यावेळी नागरिकांनी गाडीसमोर मोठी गर्दी केली. चिकन विक्रीमध्ये मोठी घट झाल्यामुळे एकीकडे बेळगाव जिल्ह्यातल्या काही भागात जिवंत कोंबड्या गाडल्या जात असताना नागरिकांचा विचार करून पोल्ट्री मालकांनी मोफत पक्षी वाटप सुरू केल आहे.
नाशिकच्या सर्वच चिकन मार्केटमध्ये ४० ते ५० रुपये किलो चिकनचे दर आहे. चीनमधील कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि चिकनचा संदर्भ जोडला गेल्यानं चिकन विक्रीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. चिकन दर दुकानागणिक बदलले आहे. चिकन अगदी स्वस्त दरात मिळू लागले आहे. कोरोना आणि चिकन दूर दूर पर्यंत काहीही संबंध नसल्याचं चिकन विक्रेते सांगून सांगून थकले आहे. त्यामुळे चिकन विक्रेते हतबल झाले असून त्यांच्यावर अक्षरशः ऑफर देण्याची नामुष्की ओढवली आहे. कोरोना आजार येण्यापुर्वी जे चिकन 150 ते 200 रुपये किलो होत तेच चिकन 40 आणि 50 रुपये किलोने विकण्याची नामुष्की चिकन विक्रेत्यांवर आली आहे.