जळगावातील पोलीस प्रशिक्षण केंद्र जामखेडला हलवणार; आमदारांनी केला विरोध, खडसेंचीही टीका

जळगावातील पोलीस प्रशिक्षण केंद्र जामखेडला हलवणार; आमदारांनी केला विरोध, खडसेंचीही टीका

पोलीस प्रशिक्षण केंद्र हलविण्यात येत असल्याने हा जळगाव जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे.

  • Share this:

इम्तियाज अली, प्रतिनिधी

जळगाव, 30 जून : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव-हतनूर पोलीस प्रशिक्षण केंद्र कॅबिनेट बैठकीत अहमदनगर येथील जामखेडमध्ये हलविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर जळगावातील मुक्ताईनगरचे  आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केला आहे. हा निर्णय रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेणार आहे. वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा ठराव नामंजुर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सर्व आमदार मिळून निवेदन देणार असल्याचं सांगितलं आहे.

पायी वारीला परवानगी मिळणार का? याचिकेवर आज सुनावणी

आघाडी सरकारने दोन दिवसांपूर्वी जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे. जळगाव जिल्ह्यावर अन्याय करणारा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 1999 साली शिवसेनेच्या काळात जो प्रकल्प मंजूर झाला होता.  झालेल्या प्रकल्पाच्या वेळी खडसे यांनी जी टीका केली, आमच्या टाईमाला आम्ही आणला व तो आघाडी सरकारच्या वेळेस गमावत असू तर चुकीचे आहे.  मग खडसे साहेब त्याला पूर्ण करू शकले नाही, हे त्यांचे अपयश आहे का? असा सवालही पाटील यांनी उपस्थितीत केला.

100 टक्के आम्ही तो प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करू व यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून आम्ही सर्व आमदार मिळून सोमवारी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. जेणे करून तो प्रकल्प येथेच राहील, असंही पाटील म्हणाले.

तर, 'जळगाव जिल्ह्यातील वरणगाव प्रशिक्षण केंद्रासाठी  1999 या वर्षी 106 एकर जमीन शासनाच्या ताब्यात आर्थिक तरतूद करून दिली होती. भूमिपूजनही करण्यात आले होते. सरकार बदलले व मागील 15 वर्षांच्या कालखंडात त्याची प्रगती होऊ शकली नाही. उलट तिथलं पोलीस प्रशिक्षण केंद्र हे माणिकराव ठाकरे गृह राज्य मंत्री असताना पांढरकवडा येथे हलविले', अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.

तसंच, 'नव्याने पुन्हा एस.आर.पी.ची तुकडी मंजूर करण्याचे ठरविले. 106 एकर जागा वर्ग करण्यात आलेली आहे. आता काम सुरू करण्याची वेळ आलेली असून पोलीस प्रशिक्षण केंद्र हलविण्यात येत असल्याने हा जळगाव जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे', अशी टीका खडसे यांनी यांनी केली.

संपादन - सचिन साळवे

First published: June 30, 2020, 10:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading