पायी वारीला परवानगी मिळणार का? याचिकेवर आज सुनावणी

पायी वारीला परवानगी मिळणार का? याचिकेवर आज  सुनावणी

पायी वारीची परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने वारकऱ्यांतर्फे आत्तापर्यंतच्या इतिहासात अशा पद्धतीने याचिका दाखल करण्याची ही पहिलीच घटना..

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 30 जून : वाखरी ते पंढरपूर दरम्यान 100 वारकऱ्यांसोबत चालत जाण्यासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज या याचिकेवर दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती पी.बी.वराळे आणि न्यायमूर्ती एस.पी.तावडे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे या याचिकेवर सुनावणी घेणार आहेत. या प्रकरणाशी संबधित असलेल्या सर्व स्वायत्त संस्थाना याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी ऑनलाइन नोटीस बजावली असून त्यांच्या तर्फे सरकारी वकील बाजू मांडतील.

दरम्यान, जगन्नाथ पुरी रथ यात्रा सोहळा 500 मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यास परवानगी दिल्या गेली. त्याच पार्श्वभूमीवर आपण याचिका केली असून मेहरबान न्यायालय आपल्या बाजूने निकाल देईल असा विश्वास वारकरी सेवा संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ रंधवे यांनी व्यक्त केला आहे.

कराचीमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर हल्ला करण्याची दिली धमकी

पायी वारीची परंपरा कायम ठेवण्यासाठीच्या उद्देशाने वारकऱ्यांतर्फे आत्तापर्यंतच्या इतिहासात अशा पद्धतीने याचिका दाखल  करण्याची ही पहिलीच घटना असल्याने या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.

ही याचिका मंजूर झाल्यास अवघ्या काही तासात वाखरी ते पंढरपूर दरम्यानच्या रस्त्यावर बंदोबस्त आणि सुविधा उभ्या कराव्या लागणार असल्याने ऐनवेळी प्रशासनाची दमछाक होऊ शकते.

पंढरपुरात संचार बंदी लागू

दरम्यान, आषाढी एकादशीला अर्थात पंढरपूर यात्रेला गर्दी होऊ नये यासाठी आज 30 जूनपासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. ज्यांना पासेस दिले आहेत, अशा नागरिकांनाच महापूजेसाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. नागरिकांना केवळ आरोग्यविषयक कारणासाठी घराबाहेर पडता येईल, असंही पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे.

तुमचेही हात थरथरतायेत का? असू शकतो मेंदूचा गंभीर आजार

आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात आहे. 1 तारखेला आषाढी एकादशी आहे. परंतु, कोरोनामुळे कोणालाही पंढरपुरात प्रवेश दिला जात नाही. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीच्या माध्यमातून दरवर्षी 12 ते 15 लाख वारकरी पंढरपुरात दाखल होतात. यंदा मात्र कोरोनामुळे आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. केवळ मानाच्या पालख्यांनाच पंढरपुरात शहरात प्रवेश दिला जाणार आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर नाकाबंदी करण्यात आली आहे.

संपादन - सचिन साळवे

 

First published: June 30, 2020, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading