पोलिसांनी दाखवली माणुसकी, पायाला गोळी लागलेल्या माओवाद्याला रुग्णालयात केले दाखल

पोलिसांनी दाखवली माणुसकी, पायाला गोळी लागलेल्या माओवाद्याला रुग्णालयात केले दाखल

छत्तीसगडमधील चकमकीत (chhattisgarh maoist attack) 22 जवान शहीद झाले होते ही घटना ताजी असताना गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात...

  • Share this:

 छत्तीसगड, 12 एप्रिल : छत्तीसगडमधील चकमकीत (chhattisgarh maoist attack) 22 जवान शहीद झाले होते ही घटना ताजी असताना गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात चकमकीत जखमी झालेल्या जहाल माओवादी (maoist) कमांडर किशोर कवडो जंगलात पोलिसांना सापडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करुन शस्ञक्रिया करवून माणुसकीचा प्रत्यय दिला आहे. दरम्यान, एका माओवादी समर्थकालाही पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यात  हेटळकसाच्या जंगलात माओवाद्याचे शिबीर उद्धवस्त केले होते. दुसऱ्या दिवशी सी सिक्स्टी या माओवाद्याविरोधी पथकाच्या कमांडोनी या भागात विशेष अभियान राबवले होते. त्यावेळी  माओवाद्यांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 5 माओवादी ठार झाले होते. या चकमकीत जहाल माओवादी भास्करचाही मृत्यू झाला होता. या चकमकीत काही माओवादी जखमी झाल्याची शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी कटेझरी पोलिसांना शोधमोहीम राबवण्याचे आदेश दिले होते.

IPL 2021 : KKR च्या या स्पोटक बॅट्समनची बायको आहे इंटिरियर डिझायनर

कटेझरी पोलिसांनी लगतच्या गावामध्ये शोध मोहीम सुरू केली होती याच शोध मोहिमेत टिपागड दलमचा डीवीसी असलेला किशोर कवडो पोलिसांना जखमी अवस्थेत सापडला. यावेळी किशोरला मदत करणारा गणेश कोला हा समर्थकही सापडला होता. हेटळकसाच्या या चकमकीत किशोरच्या पायाला गोळी लागल्याने मोठी जखम होऊन त्याला चालता येत नव्हते. सोबत असलेले दलम सदस्य त्याला सोडून निघून गेले होते.

अखेर माणुसकी दाखवत किशोरला पोलिसानी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तिथे किशोरवर शस्त्रक्रिया करुन उपचार करण्यात आल्याने किशोरचा जीव वाचला, त्याची प्रकृती आत धोक्याच्या बाहेर आहे. किशोरवर हत्या, जाळपोळ चकमकीसह 50 पेक्षा जास्त  अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यात 16 लाखाचे बक्षीस असून 2 राज्यांचे 30 लाखाचे बक्षीस आहे. पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी माओवादी चळवळीत असलेल्या माओवाद्याना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Corona :राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63,894 वर, 349 मृत्यू

दरम्यान, छत्तीसगडच्या जिल्ह्यात दंतेवाड़ा जिल्हयात पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक झाली असून एका माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे तर काही माओवादी जखमी आहेत . दंतेवाड़ा जिल्ह्यात कटेकल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गड्डमच्या जंगलात पोलीस आणि माओवादी यांच्यात दुपारी चकमक झाली एका तासाच्या चकमकीनंतर घटनास्थळी एका माओवाद्याचा मृतदेह घटनास्थळी आढळून आला आहे.

माओवाद्यांनी 70 लाखांची वाहनं जाळली

या चकमकीत काही माओवादी जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. घटनास्थळी शोधमोहीम राबवल्यानंतर तिथे एक पिस्तुल एक भरमार बंदुकीसह दोन आयडीबाॅम्ब सापडले आहेत. दोन पिट्टु आणि इतर माओवादी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. ही चकमक घडत असताना लगतच्या बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी पाणी पुरवठ्याच्या कामावरील पाच वाहनांची जाळपोळ केली आहे. पाणी पुरवठ्याच्या कामावर दुपारी सशस्त्र माओवाद्यांनी येऊन दोन पोकलॅन एक ट्रॅक्टरसह पाच वाहने जाळली असून वाहनांची किमत 70 लाखापेक्षा जास्त असल्याचे वृत्त आहे.

Published by: sachin Salve
First published: April 11, 2021, 10:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या