आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरूवात KKR ने धमाक्यात केली आहे. त्यांचा ओपनर नितीश राणा (Nitish Rana) याने 56 बॉलमध्ये 80 रनची खेळी केली. नितीशने त्याच्या या खेळीमध्ये 9 फोर आणि 4 सिक्स मारले. नितीश राणाने 2019 साली त्याची गर्लफ्रेंड सांची मारवारसोबत (Sanchi Marwar) लग्न केलं. नितीशने आयपीएलच्या मागच्या मोसमात 14 सामन्यांमध्ये 138.58 च्या स्ट्राईक रेटने 352 रन केले होते. (Photo- Sanchi Marwar Instagram)