Home /News /maharashtra /

विनामास्क रॅली काढणे भोवले, भिडे गुरुजींसह 80 जणांवर गुन्हे दाखल

विनामास्क रॅली काढणे भोवले, भिडे गुरुजींसह 80 जणांवर गुन्हे दाखल

संभाजी भिडे गुरुजी यांनी शेकडो धारकांऱ्यांसह कराड शहरातून बेकायदेशीर जमाव जमवून विनामास्क रॅली काढली होती.

सातारा, 06 जुलै: 'मास्क वापरू नका' असं जाहीरपणे वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचे उल्लंघन केले होते. या प्रकरणी आता सातारा पोलिसांनी (Satara police) भिडे यांच्यासह 80 धारकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. साताऱ्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. पण असं असताना देखील नियमांचं उल्लंघन करत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी शेकडो धारकांऱ्यांसह कराड शहरातून बेकायदेशीर जमाव जमवून विनामास्क रॅली काढली होती.

...त्यामागे काही विशेष संदेश आहे काय? सेनेचा भागवतांच्या विधानावर सवाल

अखेर भिडे गुरुजींसह 80 धारकऱ्यांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पायी दिंडी काढून जाण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे. परंतु ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लघंन करुन आषाढी वारीसाठी जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. शासनाने बंडातात्या कराडकर यांच्यासह वारकर्‍यांना वारीसाठी परवानगी द्यावी. या मागणीला समर्थन देत सोमवारी संभाजी भिडे गुरुजी यांनी दत्त चौकातून शेकडो धारकांऱ्यांसोबत रॅली काढत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्यांच्यासह 80 धारकांऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

मोदींचा असाही मास्टरस्ट्रोक, सेनेला डिवचत अवजड खाते राणेंना मिळणार?

काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये बोलताना 'कोरोना अस्तित्वात नाही. सरकारने काहीही करू नये, ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे. कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे? मास्क लावण्याची गरज नाही,' असं म्हणत संभाजी भिडे यांनी अकलेचे तारे तोडले होते. तसंच, कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे, प्रत्येकाच्या जीवाची काळजी जो तो घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये.  कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा, कोरोना- कोरोना आक्रोश चालला आहे.. पण कोरोना अस्तित्वात नाही, लॉकडाऊनची गरज नाही. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील, असंही भिडे म्हणाले होते.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

Tags: Mask, Satara, सातारा

पुढील बातम्या