• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • सिंघम बनायची हौस भोवली, हातात पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवणारा अमरावतीचा हवालदार निलंबित

सिंघम बनायची हौस भोवली, हातात पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवणारा अमरावतीचा हवालदार निलंबित

निलंबित हवालदार महेश काळेंच्या व्हिडिओतील दृश्य

निलंबित हवालदार महेश काळेंच्या व्हिडिओतील दृश्य

आपल्या युनिफॉर्ममध्ये (Uniform) आणि सरकारी पिस्तुल (Service Revolver) हातात घेऊन व्हिडिओ (Video) तयार करणं, एका हवालदाराला (Police constable) चांगलंच महागात पडलंय.

 • Share this:
  अमरावती, 6 ऑगस्ट : आपल्या युनिफॉर्ममध्ये (Uniform) आणि सरकारी पिस्तुल (Service Revolver) हातात घेऊन व्हिडिओ (Video) तयार करणं, एका हवालदाराला (Police constable) चांगलंच महागात पडलंय. गुंडांनी दादागिरी करू नये, असा संदेश देण्याचा प्रयत्न या हवालदारानं केला असला, तरी अशा प्रकारे व्हिडिओ बनवणं, हे नियमांना धरून नसल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारमध्ये कार्यरत असलेल्या हवालदार महेश मुरलीधर काळे यांनी हातात पिस्तुल घेऊन एक व्हिडिओ तयार केला, अशी बातमी दैनिक भास्करनं दिली आहे. वर्दी घालून आणि हातातील पिस्तुल कॅमेऱ्यावर रोखून तयार केलेल्या या व्हिडिओत हवालदार काळे हे गुंडांना कायदा हातात न घेण्याचा इशारा देत असल्याचं दिसतं. जो कायदे मे रहेगा, वो फायदे मे रहेगा जो कायदे मे रहेगा, वो फायदे मे रहेगा असं सांगत अमरावतीत येताना गुंडगिरी आणि दादागिरी 10 किलोमीटर लांब ठेऊन येण्याचा इशारा त्यांनी गुंडांना दिला आहे. अमरावती हा कायद्याचा बालेकिल्ला असून गुंडगिरी करणाऱ्यांची खैर नाही, असा इशाराच त्यांनी या व्हिडिओतून दिला आहे. हा व्हिडिओ शूट करून त्यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर काही दिवसांतच तो व्हायरल झाला. लवकरच काळे यांच्या वरिष्ठांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. या व्हिडिओवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांनी काळे यांच्या निलंबनाची घोषणा केली. हे वाचा -भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्लीला तर राज ठाकरे पुण्याला रवाना पिस्तुल दाखवणे भोवले कायद्यानुसार सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचं जाहीर प्रदर्शन करणं नियमबाह्य आहे. अशा प्रकारे पोलीस खुलेआम बंदूक हातात घेऊन व्हिडिओ करू लागेल, तर त्यातून पोलीस दलाबाबत चुकीची प्रतिमा तयार होण्याची शक्यता असते, असं वरिष्ठ पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे काळे यांच्या या व्हिडिओवर आक्षेप घेत त्यांचं निलंबन करण्यात आलं.
  Published by:desk news
  First published: