जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: पालकांनो सावधान! मुंबईत शालेय मुलांना अशाप्रकारे ड्रग्ज विक्री करायची महिला, वाचा संपूर्ण कहाणी

VIDEO: पालकांनो सावधान! मुंबईत शालेय मुलांना अशाप्रकारे ड्रग्ज विक्री करायची महिला, वाचा संपूर्ण कहाणी

VIDEO: पालकांनो सावधान! मुंबईत शालेय मुलांना अशाप्रकारे ड्रग्ज विक्री करायची महिला, वाचा संपूर्ण कहाणी

मुंबईतील बोरिवली परिसरातील एका शाळेबाहेर नेहमीप्रमाणे ही महिला काल मुलांना अंमली पदार्थ विकण्यासाठी आली. इतक्यात शाळेजवळील बागेत 4-5 मुले गांजा पित असल्याचं एका व्यक्तीने पाहिलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अमित राय, मुंबई 24 सप्टेंबर : तुमचं तुमच्या मुलावर लक्ष आहे का? तुमचं मूल शाळेतून वेळेवर घरी परततं का? तो खूप सुस्त आहे का? तो खाण्याच्या बाबत निष्काळजी आहे का? तो शाळेत रोज पैसे घेऊन जातो का? जर असं असेल तर आता तुम्ही आपल्या पाल्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण आजकाल मुंबईतील शाळांबाहेर अमली पदार्थांची विक्री झपाट्याने वाढली आहे. विशेषत: हे ड्रग्ज सप्लायर 13 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांना टार्गेट करून त्यांना या नशेची सवय लावत आहेत. अशाच एका प्रकरणात पोलिसांनी एका महिलेला पकडलं आणि तिच्याकडून ड्रग्ज जप्त केले आहेत. मुले चोरणारी टोळी समजून दोघांना बेदम मारहाण; नाशिकमधील घटनेचा VIDEO आला समोर दुपट्ट्याने चेहरा लपवून पोलिसांच्या व्हॅनमध्ये चढणाऱ्या या महिलेचं नाव बिल्किस खान असं आहे. ती मुंबईतील बोरीवली परिसरातील अनेक शाळांच्या बाहेर विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकते आणि त्यांना नशा करण्याची सवय लावते. दिवसेंदिवस नशा करणाऱ्या शाळकरी मुलांची संख्या वाढत आहे. यामुळे लोक शाळांबाहेर पहारा देऊ लागले.

जाहिरात

मुंबईतील बोरिवली परिसरातील एका शाळेबाहेर नेहमीप्रमाणे ही महिला काल मुलांना अंमली पदार्थ विकण्यासाठी आली. इतक्यात शाळेजवळील बागेत 4-5 मुले गांजा पित असल्याचं एका व्यक्तीने पाहिलं. काही लोकांच्या मदतीने या नागरिकाने एका मुलाला पकडून त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. यानंतर मुलाच्या मदतीने या महिलेची ओळख पटली.

बिल्कीसची ओळख पटताच नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने महिलेच्या घराची झडती घेतली. त्यानंतर पोलिसांना महिलेच्या घरात गांजा सापडला. पोलिसांनी महिलेला एनडीपीएस कायद्यान्वये अटक केली. त्यात एक धक्कादायक बाब समोर आली. महिलेची चौकशी केली असता समोर आलं की ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील मुलांना ड्रग्ज विकायची आणि 13 ते 16 वर्षे वयोगटातील मुलं टार्गेट असायची. तोंडामध्ये मिरची कोंबली अन् कपडे फाडले, गुप्तांगावर ओतली दारू, पुण्यातील संतापजनक घटना या महिलेला अटक केल्यानंतर आता ही महिला ड्रग्ज कुठून आणायची आणि तिचे आणखी कोणी साथीदार मुंबईत सक्रिय आहेत का? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. या महिलेच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, वाढत्या वयात आपली मुलं चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत यासाठी पालकांनी काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Drugs
  • First Published :
जाहिरात
जाहिरात