मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुले चोरणारी टोळी समजून दोघांना बेदम मारहाण; नाशिकमधील घटनेचा VIDEO आला समोर

मुले चोरणारी टोळी समजून दोघांना बेदम मारहाण; नाशिकमधील घटनेचा VIDEO आला समोर

मुले चोरणारी टोळी म्हणून दोघांना जमावाने बेदम मारहाण केली. नाशिकच्या गंजमाळ भागात ही घटना घडली

मुले चोरणारी टोळी म्हणून दोघांना जमावाने बेदम मारहाण केली. नाशिकच्या गंजमाळ भागात ही घटना घडली

मुले चोरणारी टोळी म्हणून दोघांना जमावाने बेदम मारहाण केली. नाशिकच्या गंजमाळ भागात ही घटना घडली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Kiran Pharate

नाशिक 24 सप्टेंबर : लहान मुले चोरणारी टोळी समजून मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच आता अशीच एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. यात मुले चोरणारी टोळी म्हणून दोघांना जमावाने बेदम मारहाण केली. नाशिकच्या गंजमाळ भागात ही घटना घडली. नाशिकमध्ये मुले चोरी करणारी टोळी आल्याची अफवा पसरली आहे. शहराच्या अनेक ही अफवा पसरली आहे.

अपहरणकर्त्याने स्वतःच मुलीला मध्यरात्री घरी आणून सोडलं अन् तिथेच गेला आरोपीचा जीव, अमरावतीत काय घडलं?

याच अफवेमुळे गाडीतील पैसे चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना मुले चोरणारी टोळी समजून नागरिकांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. पोलिसांनी वेळेत पोहोचून दोघांना वाचवलं आणि उपचारासाठी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केलं आहे.

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुले चोरणारी टोळी आल्याची अफवा व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याच कारणामुळे नागरिक प्रत्येकाला संशयाच्या नजरेत बघत असून अशा घटना घडत आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी गंजमाळ परिसरात घडली. यात चोर एका चारचाकी गाडीच्या नंबर प्लेटवर कलर टाकून गाडीमध्ये असलेली बॅग पळवण्याच्या तयारीत असताना ही बाब वाहनचालकाच्या निदर्शनास आली.

वाजत-गाजत सासरी गेली, मनसोक्त नाचली पण..; लग्नानंतर सहाव्या दिवशीच नवरीचं भयंकर कांड

या घटनेमुळे नागरिकांनी चोर चोर अशी आरडाओरड केली. यामुळे दोघेही चोर समोरच असलेल्या पंचशीलनगर झोपडपट्टीकडे पळाले.यानंतर परिसरातील नागरिकांनी चोर इतकं ऐकूनच मुलं चोरणारी टोळी असल्याचं समजून त्यांना बेदम मारहाण केली. हे दोघं भाऊ असून ते मूळचे औरंगाबादचे रहिवासी आहेत. साहिल लक्ष्मीकुंठे आणि प्रभास लक्ष्मीकुंठे अशी त्यांची नावं आहेत.

First published:

Tags: Crime news, Kidnapping, Theft