जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'हेमंत चुकीचं वागू शकत नाही', अमित शाहांभोवती घुटमळणाऱ्या तरुणाच्या आई-वडिलांचा दावा

'हेमंत चुकीचं वागू शकत नाही', अमित शाहांभोवती घुटमळणाऱ्या तरुणाच्या आई-वडिलांचा दावा

अमित शाह

अमित शाह

अमित शाह यांच्या अवतीभोवती फिरणारा तरुण हा धुळ्याचा असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. त्याच्या आई-वडिलांनी आपला मुलगा काही चुकीचं काम करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

  • -MIN READ Dhule,Maharashtra
  • Last Updated :

धुळे, 8 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेत चूक झाल्याचं समोर आलं होतं. अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी एक तरुण त्यांच्या मागेपुढे घुटमळत होता. अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणेचा मोठा ताफा असतो. पण तरीदेखील एवढी सुरक्षा झुगारुन एक तरुण त्यांच्या ताफ्यात शिरतो आणि त्यांच्या मागे-पुढे घुटमळतो. यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं तेव्हा त्याने आपण गृहमंत्रालयाचा अधिकारी आहोत, असं सांगितलं होतं. पण तो तरुणा अधिकारी नव्हता, असं तापासात समोर आलं आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमित शाह यांच्या अवतीभोवती फिरणारा तरुण हा धुळ्याचा असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. अमित शाह यांच्या मागेपुढे घुटळणाऱ्या तरुणाचं हेमंत पवार असं नाव आहे. हा तरुण धुळे जिल्ह्यातील दाऊळ गावाचा रहिवासी आहे. हेमंत पवारचे वडील निवृत्त पोस्टमन असून आता ते शेती करतात. हेमंत पवारच्या कामाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं त्याच्या आई-वडिलांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी हेमंतला का ताब्यात घेतलं आहे? याबाबत आम्हाला कुठलीही कल्पना नाही. चॅनलवर बातम्या बघून माहिती मिळाली. हेमंत चुकीचं काम करू शकत नाही. त्याला चौकशी करून सोडून देण्यात यावं, अशी मागणी हेमंतच्या वडिलांची केली. ( शिवसेना-भाजप संघर्ष पेटण्याची चिन्हं, भास्कर जाधवांविरोधात पोलिसांत तक्रार ) अमित शाह यांच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्यानंतर आता सीआरपीएफने कडक पावलं उचलली आहे. सीआरपीएफने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सीआरपीएफ मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिणार आहे. ज्या आरोपीला सीआरपीएफच्या जवानांनी पाहिले तो संशयास्पद फिरत होता. त्या परिसरातली सुरक्षाही राज्य पोलिसांकडे आहे. ज्या व्यक्तींना सुरक्षा पुरवण्यात येणार आहे, त्यांना सर्व चौकशी करूनच सुरक्षा देण्यात यावी, असं सीआरपीएफने स्पष्ट केलं आहे. तसंच ज्या व्यक्तींना सुरक्षा पुरवली आहे, त्या व्हीआयपी व्यक्तीकडे कुणालाही जाण्यास परवानगी देऊ नये, असंही सीआरपीएफचं म्हणणं आहे. हेमंतने पोलीस आणि शहा यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी केंद्रीय गृह खात्याचा सुरक्षा अधिकारी असल्याचे भासवले होते. त्यानुसार गळयामध्ये गृह मंत्रालय/ मिनिस्ट्री ऑफ होमअफेअर्स असे नामनिर्देष असलेली निळया रंगाची आयकार्डसोबत असणारी रिबीन लावून शासकीय अधिकारी असल्याची बतावणी केली. या बनावट आयकार्डच्या मदतीने हेमंतने अमित शहा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर असताना तेथील कार्यक्रमात जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हेमंतवर मलबार हिल पोलीस ठाण्यात कलम 170,171 भादंवि अंतर्गग गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली. स्वतःची राजकीय व्यक्तींशी जवळीकता असल्याचे भासवून त्यामार्फत आर्थिक लाभ मिळवण्याकरीता त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात