निखील चव्हाण, प्रतिनिधी
ठाणे, 12 डिसेंबर : आपल्या पोटच्या मुलांना वाढवण्यासाठी त्यांना जगवण्यासाठी तसंच भविष्यात मोठं करण्यासाठी अनेक आई-वडील पराकाष्टा करतांना पाहायला मिळतात. मात्र काही रुपयांसाठी चार दिवसांपूर्वी जन्मलेल्या पोटच्या मुलीची एजंटच्या मार्फत विक्री ( selling 4-day-old baby) करणाऱ्या आई वडिलांसह नातेवाईकांना ठाणे (thane police) गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. ठाणे पोलिसांनी रचलेला हा सर्व बनाव cctv मध्ये कैद झाला आहे.
मुंबईत पोटच्या मुलीची आईकडून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, ठाण्यात 4 दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीची विक्री करणाऱ्या आई, वडील तसंच एजंट आणि नातेवाईकांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली असल्याची घटना समोर आली आहे.
बाळ विक्री बाबत गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाला माहिती मिळाली असता. सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून मध्यस्थी असलेल्या दलाल महिलेला संपर्क केला.
ओमायक्रॉन नाही भीतीने कुटुंब संपलं; पत्नी-मुलांचा मारेकरी डॉक्टरची मिळाली माहिती
दरम्यान, या बाळाचा सौदा हा दीड लाखात ठरला. त्यानंतर बाळाची विक्री करणाऱ्या आई-वडील ,नातलग आणि मध्यस्थी असणाऱ्या एजंटला ठाण्यातील केसल मिल येथील हॉटेल स्वागतमध्ये बोलावण्यात आले. त्यानुसार, संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्वागत हॉटेल्स येथे बाळाची विक्री करण्यासाठी संबंधित सर्वच कागदपत्रासह सहा जण उपस्थित राहिले. यात नवजात बालकाची आई मुमताज वकील अन्सारी, वडील वकील शकील अन्सारीसह इतरांना यावेळी मोठ्या शिताफीने ठाणे गुन्हे शाखेचा पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
पोलिसांनी रचलेला सर्व बनाव cctv मध्ये कैद झाला आहे. तर संबंधित नवजात बालकाला संगोपनासाठी डोंबिवली येथील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट इथं ठेवण्यात आल्याची माहिती सह पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Thane, Thane crime