मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ओमायक्रॉन नाही भीतीने कुटुंबाचा शेवट; पत्नी-मुलांची हत्या करणाऱ्या डॉक्टरची मिळाली माहिती

ओमायक्रॉन नाही भीतीने कुटुंबाचा शेवट; पत्नी-मुलांची हत्या करणाऱ्या डॉक्टरची मिळाली माहिती

पत्नी आणि दोन्ही मुलांची हत्या करणाऱ्या डॉक्टरचा गेल्या 10 दिवसांपासून शोध घेतला जात होता.

पत्नी आणि दोन्ही मुलांची हत्या करणाऱ्या डॉक्टरचा गेल्या 10 दिवसांपासून शोध घेतला जात होता.

पत्नी आणि दोन्ही मुलांची हत्या करणाऱ्या डॉक्टरचा गेल्या 10 दिवसांपासून शोध घेतला जात होता.

    कानपूर, 12 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) कानपुरमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन वेरिएंटला घाबरून पत्नी आणि मुलांची हत्या (Murder) करून फरार झालेला डॉक्टर सुशील सिंह याचाही मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने हत्या केल्यानंतर गंगेत उडी मारून आत्महत्या (Suicide) केली होती. कानपूरमध्ये जाजमऊ स्थित सिद्धनाथ घाटात रविवारी त्यांचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह बऱ्याच दिवसांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या नातेवाईकांनीही मृतदेहाची ओळख पटवली आहे. 3 डिसेंबर रोजी डॉक्टरने पत्नी आणि 2 मुलांची हत्या केली होती. इंदिरा नगरमधील डिवनिटी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या डॉ. सुशील सिंहने पत्नीच्या डोक्यावर जड वस्तूने मारहाण केली आणि मुलांना विष देऊन हत्या केली होती. यानंतर हे प्रकरण उगलगडत नव्हतं. यासाठी डॉक्टरचा शोध केला जात होता. हे ही वाचा-पहिल्या पत्नीला सुखात पाहून तरुण दुखावला; सूड उगवण्यासाठी पतीने आखला प्लान भावाला मेसेज करून झाले फरार... डॉक्टरने पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर भावाला मेसेज करून पोलिसांना बोलावण्यास सांगितलं होतं. भाऊ पोहोचण्यापूर्वीच आरोपी डॉक्टर घटनास्थळाहून फरार झाला होता. पोलिसांना डॉक्टरच्या घरी एक डायरी सापडली होती, ज्यात डॉक्टरने हत्येमागील कारण कोरोनाचं नवं व्हेरिएंट ओमायक्रॉन असल्याचं सांगितलं आहे. डॉक्टरने सुसाइड नोटमध्ये लिहिलं की... डॉक्टरच्या घरातून पोलिसांना एक डायरी मिळाली. यात लिहिलं होतं की, आता आणखी कोविड नाही. हा ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल. आता आणखी मृतदेह मोजायचे नाहीयेत. स्वत:च्या निष्काळजीपणामुळे मी करिअरच्या अशा टप्प्यावर येऊन अडकलोय, जेथून बाहेर पडणं अशक्य आहे. माझं काहीच भविष्य नाही. त्यामुळे मी शुद्धीत आपल्या कुटुंबाची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करेन. यासाठी कोणीच जबाबदार नसेल.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Murder news, Suicide, Uttar pradesh news

    पुढील बातम्या