जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ठाकरे गट आता उतरणार रस्त्यावर, पोलिसांनी 'या' अटींसह दिली परवानगी

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ठाकरे गट आता उतरणार रस्त्यावर, पोलिसांनी 'या' अटींसह दिली परवानगी

 शिवाजी मैदान ते आनंद दिघे शक्तिस्थळापर्यंत मोर्चाला परवानगी

शिवाजी मैदान ते आनंद दिघे शक्तिस्थळापर्यंत मोर्चाला परवानगी

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाणे पोलिसांनी आज ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी दिली आहे. या मोर्चासाठी ठाकरे गटाला काही नियम घालून दिले आहे.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 05 एप्रिल : ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाने आता मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. आता या मोर्चाला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. काही नियमांचे पालन करून हा मोर्चा काढावा लागणार आहे. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाणे पोलिसांनी आज ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी दिली आहे. या मोर्चासाठी ठाकरे गटाला काही नियम घालून दिले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मोर्च्याच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्य वक्तव्य करायची नाही, आक्षेपार्य गाणी म्हणायची नाही, आक्षेपार्य घोषणा द्यायचा नाहीत, हातात फलक घेवू नये, घेतल्यास त्यावर कोणाच्या भावना दुखावतील असे मजकूर लिहू नये, अशी सूचना पोलिसांनी ठाकरे गटाला दिली आहे. मोर्चा मार्गात हॅास्पिटल आणि शाळा असल्या कारणाने आवाजाची मर्यादा पाळावी आणि या मोर्च्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होवू देवू नये, कोणत्या ही चित्र विचित्र कृती आकृतींचे प्रदर्शन करू नये, अशा विविध अटींसह परवानगी दिली आहे. (तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद करू, पुण्यात काँग्रेस नेत्याला धमकीचा फोन) दरम्यान, या मोर्च्याला पोलीस आयुक्त कार्यालयात जाण्याची परवनागी नाकारली आहे. शिवाजी मैदान ते आनंद दिघे शक्तिस्थळापर्यंत मोर्चाला परवानगी असणार आहे. आनंद दिघे शक्ती स्थळावर या मोर्चाची सांगता होणार आहे. त्यानंतर 5 जणांचे एक शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांना निवेदन द्यायला जाणार आहे. दरम्यान, दिल्लीत ठाण्यातील रोशनी शिंदे हल्ला प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी संसद परिसरातील कार्यालयात मित शहा यांची भेट घेतली. रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात