मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संजय राठोडांचा राजीनामा मंजूर केल्यामुळे पोहरादेवीचे महंत संतापले, म्हणाले...

संजय राठोडांचा राजीनामा मंजूर केल्यामुळे पोहरादेवीचे महंत संतापले, म्हणाले...

'संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांच्यावरील आजची कारवाई ही अन्यायकारक आहे'

'संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांच्यावरील आजची कारवाई ही अन्यायकारक आहे'

'संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांच्यावरील आजची कारवाई ही अन्यायकारक आहे'

  • Published by:  sachin Salve

वाशिम, 28 फेब्रुवारी : पूजा चव्हाण प्रकरणी (Pooja Chavan case) अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्यामुळे पोहरादेवी मंदिर येथील महंतानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

'संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांच्यावरील आजची कारवाई ही अन्यायकारक आहे. केवळ विरोधी पक्षाच्या मागणीमुळे ही कारवाई झाली आहे. चौकशी आणखी होणे बाकी असतांना वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणे चुकीचे आहे. समाजामध्ये राजीनाम्यावरून नाराजी' असल्याचं पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी म्हटलं आहे.

'पूजा चव्हाण प्रकरणाची अद्याप चौकशी झालेली नाही. फक्त विरोधकांनी या प्रकरणी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आम्ही आधीच्या मागणीवर ठाम आहोत. चौकशी केल्यानंतर कारवाई केली असती तर स्वीकारले गेले असते. या प्रकरणामुळे समाजाची नाहक बदनामी झाली आहे. मोठ्या प्रमाणात चिखलफेक झाली आहे. कोरोनाचा काळ ओसरल्यानंतर आम्ही बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, या बैठकीला संजय राठोड नक्की येतील', असंही जितेंद्र महाराज यांनी सांगितले.

दरम्यान, महंत जितेंद्र महाराज यांनी आज सकाळी ई-मेलद्वारे मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. संजय राठोड यांच्याबद्दल ज्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहे, त्याबद्दल सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नये, अशी विनंती जितेंद्र महाराज यांनी केली होती.

तसंच, जर वनमंत्री संजय राठोड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला तर पोहरादेवी गडावरून राठोड यांना शिवसेनेच्या आमदारकीचा ही राजीनामा द्यायला लावू, असा इशाही जितेंद्र महाराज यांनी दिला होता. परंतु, संजय राठोड यांच्या भूमिकेनंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे महंत जितेंद्र महाराज म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी स्विकारला संजय राठोडांचा राजीनामा

आज सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. पण, मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली होती. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावाच लागणार हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास संजय राठोड हे आपल्या पत्नीसह वर्षा बंगल्याकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा सोबत ठेवला होता.

वर्षा बंगल्यावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यात चर्चा झाली. राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. 'मी राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊ द्या. त्यात मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजूर करा' अशी विनंती राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पण, मुख्यमंत्री आपल्या निर्णयावर ठाम होते.

First published:

Tags: Beed, Maharashtra, Pooja Chavan, Sanjay rathod, Sanjay rathod resign, Suicide news, Uddhav thackeray