मुंबई, 19 ऑक्टोबर : केबीसी 11 च्या 18 ऑक्टोबरला झालेल्या एपिसोडमध्ये पहिल्यांदाच असं झालं की, एका स्पर्धकाला एक्सपर्टचा सल्ला ही लाइफलाइन वाया गेली. स्पर्धकाला विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर पत्रकार राहुल देव सुद्धा देऊ शकले नाही. त्यामुळे छत्तीसगढचे स्पर्धक जालिम साय यांना केवळ 6.40 लाख रुपयांच्या रक्कमेवर समाधान मानावं लागलं. त्यांनी ज्या प्रश्नावर खेळ सोडला हा प्रश्न बॉलिवूडशी संबंधित आहे. या प्रश्नाचं उत्तर Google शोधणंही नाही सोप्पं सर्वाधिक सिने गीत लिहण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे? a. गुलजार b. जावेद अख्तर c. समीर d. अंजान ‘या’ आहेत बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्री, संपत्ती ऐकून व्हाल थक्क!
या प्रश्नाचं अचूक उत्तर निश्चित वेळेत बॉलिवूडचा कोणाही विशेषज्ञ देऊ शकत नाही. कारण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पाहून सर्वांचच लक्ष गुलजार यांच्याकडे जातं. तसेच गीतकार समीर आणि त्यांचे वडील अंजान यांच्या नावाबाबत गोंधळ आहे. कारण समीर त्यांचं पूर्ण नाव समीर अंजान लिहितात. त्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड समीरच्या नावानं आहे की अंजान यांच्या नावानं हे ठरवणं कठीण आहे. बॉलिवूडच्या या 5 अभिनेत्री ज्यांनी नाकारले शाहरुख-सलमान-आमिरचे सिनेमे काय म्हणाले एक्सपर्ट एक्सपर्ट राहुल देव यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले मला ज्या विषयी थोडी भीती वाटते तो विषय म्हणजे मनोरंजन माझ्या अंदाजाप्रमाणे यात गुलजार हा अचूक पर्याय ठरू शकतो. पण शेवटी त्यांचा सल्ला होता की जालिम यांनी खेळ सोडून द्यावा कारण राहुल यांना स्वतःच्या उत्तरावर अजिबात विश्वास नव्हता. काय आहे अचुक उत्तर बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता की, सिनेमांमध्ये भरपूर गाणी असत. त्यावेळी गीतकार समीर यांनी असंख्य गाणी लिहिली होती. एवढंच नाही तर समीर अनेक दिवस सतत प्रसिद्ध गाण्याचे लिरिक्स लिहित होते. या प्रश्नाचं अचूक उत्तर गीतकार समीरच होते. त्यांच्याच नावावर सर्वाधिक गाणी लिहिल्याचा रेकॉर्ड आहे. तर गुलजार अंजान किंवा जावेद अख्तर यांनी समीर यांच्या तुलनेत कमी गाणी लिहिली आहेत. OMG! हेअरस्टाइल बदलल्यामुळे प्रोड्युसरनं अभिनेत्याला दिली जीवे मारण्याची धमकी जालिम यांनी पहिल्याच प्रश्नावर लाइफलाइन घेतली होती. मात्र नंतर त्यांनी सावध खेळ खेळला. मात्र 12.50 लाख रुपयांच्या प्रश्नावर 2 लाइफलाइन वापरल्या. पण त्यांना अचूक उत्तर मिळालं नाही. ========================================================== पाऊस नाही शरद पवार बरसले, भरपावसातलं UNCUT भाषण