...म्हणून सनी देओलनं शाहरुख खानसोबत काम करणं केलं बंद

...म्हणून सनी देओलनं शाहरुख खानसोबत काम करणं केलं बंद

1993 मध्ये आलेल्या 'डर' सिनेमात सनी देओलनं शाहरुख खानसोबत काम केलं. त्यानंतर मात्र त्यानं शाहरुखसोबत काम करायला नकार दिला.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आज 63 वा वाडदिवस साजरा करत आहे. सनीनं बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमा दिलेत. अनेक अभिनेत्यांसोबत काम केल्यानंतर सनीच्या करिअरमध्ये असा काळ आला ज्यानंतर त्यानं एकट्यानं काम करायला सुरुवात केली. 1993 मध्ये आलेल्या 'डर' सिनेमात सनी देओलनं शाहरुख खानसोबत काम केलं. त्यानंतर मात्र त्यानं शाहरुखसोबत काम करायला नकार दिला. या सिनेमात सनी मुख्य अभिनेत्याची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण शूट सुरू झाल्यानंतर मात्र त्याला समजलं की तो सिनेमाचा हिरो नाही आहे.

या सिनेमात शाहरुखच्या भूमिकेवर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. सनी देओलनं एका मुलाखतीत सांगितलं, 'यश चोप्रा आणि शाहरुख यांना माहित होतं की सिनेमा कुठे जात आहे. मात्र सर्वांनी मला अंधारात ठेवलं. जेव्हा मला शाहरुख आणि माझ्या भूमिकांमधील सीन समजवण्यात आले त्यावेळी मला एवढा राग आला होता की मी माझे हात जीन्सच्या खिशात टाकले. पण रागाच्या भरात माझी जीन्स कधी फाटली हेच मला समजलं नाही.'

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, बिग बी अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

'ढाई किलो के हाथ' ने सर्वांना घाबरवून सोडणारा सनी देओलचं म्हणणं होतं की, त्याला या सिनेमा आणि त्यातील भूमिकेबाबत अगोदर सांगायला हवं होतं. शाहरुखची भूमिका ही सनीच्या भूमिकेपेक्षा वरचढ असेल असं त्याला आधी सांगण्यात आलं नव्हतं. शाहरुखनंही त्याला याबाबत काही कल्पना नाही त्यामुळे सनीनं निर्णय घेतला की, यापुढे शाहरुख किंवा यशराज बॅनरसोबत काम करणार नाही. या घटनेनंतर सनीनं अनेक सिनेमांत एकट्यानं काम केलं. पण त्यानं भाऊ बॉबी देओलसोबत मात्र अनेक सिनेमात एकत्र काम केलं.

'या' आहेत बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्री, संपत्ती ऐकून व्हाल थक्क!

जेव्हा सनीला तो शाहरुखशी १६ वर्ष का बोलला नाही याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, 'असं काही नाहीये, की मी त्याच्याशी बोललो नाही. पण माहीत नाही का पण जास्त पार्टी किंवा कार्यक्रमांना जात नाही. कोणाशी जास्त बोलत नाही. आम्ही दोघं एकत्र असे कधी भेटलोच नाही तर बोलण्याचा प्रश्नच येत नाही. मी सार्वजनिक ठिकाणीही फार कमी जातो. मी अनेकांसोबत एकत्र काम करतो पण कोणाशी जास्त बोलत नाही.'

सनीला डर सिनेमाच्या सेटवर शाहरुखपासून दिग्दर्शकांपर्यंत सगळेच तुला घाबरायचे का असा प्रश्न विचारला असता सनी देओल म्हणाला की, 'त्यांना माझ्याबद्दल भीती वाटत असेल कारण त्यांच्या मनात खोट असेल. यानंतर सनी जोरजोरात हसायला लागला.' सनी देओलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकतंच सनीने भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. गुरदासपुरमधून तो खासदार म्हणून निवडून आला. तर शाहरुख खान 2018 शेवटचा झिरो सिनेमात दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता.

बॉलिवूडच्या या 5 अभिनेत्री ज्यांनी नाकारले शाहरुख-सलमान-आमिरचे सिनेमे

==================================================================

पाऊस नाही शरद पवार बरसले, भरपावसातलं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading