मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /PM मोदींच्या हस्ते मुंबईत ड्रायव्हरलेस मेट्रोचं उद्घाटन, जाणून घ्या कशी आहे सेवा?

PM मोदींच्या हस्ते मुंबईत ड्रायव्हरलेस मेट्रोचं उद्घाटन, जाणून घ्या कशी आहे सेवा?

पंतप्रधान आज 'मुंबई 1' हे मोबाइल अ‍ॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचंही (मुंबई 1) उद्घाटन करतील. त्याचा वापर मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारावर यूपीआयच्या माध्यमातून तिकीट खरेदीसाठी करता येणार आहे.

पंतप्रधान आज 'मुंबई 1' हे मोबाइल अ‍ॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचंही (मुंबई 1) उद्घाटन करतील. त्याचा वापर मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारावर यूपीआयच्या माध्यमातून तिकीट खरेदीसाठी करता येणार आहे.

पंतप्रधान आज 'मुंबई 1' हे मोबाइल अ‍ॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचंही (मुंबई 1) उद्घाटन करतील. त्याचा वापर मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारावर यूपीआयच्या माध्यमातून तिकीट खरेदीसाठी करता येणार आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 19 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून ते विविध उपक्रमांचे उद्घाटन करणार आहेत. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असलेल्या मुंबईमध्ये रेल्वेचं विस्तृत जाळं पसरलेलं आहे. नागरिकांना आणखी जलद प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी मेट्रोचादेखील वेगानं विस्तार केला जात आहे. पंतप्रधान सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. यामध्ये दोन मेट्रो लाइन्सचा समावेश आहे. मोदी मुंबईमध्ये संध्याकाळी 6 वाजता अंदाजे 12 हजार 600 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या दोन मेट्रो लाइन्सचं उद्घाटन करतील. 20 जानेवारीला संध्याकाळी चार वाजल्यापासून या दोन्ही लाइन्स नागरिकांसाठी खुल्या होणार आहेत. याशिवाय, पंतप्रधान आज 'मुंबई 1' हे मोबाइल अ‍ॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचंही (मुंबई 1) उद्घाटन करतील. त्याचा वापर मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारावर यूपीआयच्या माध्यमातून तिकीट खरेदीसाठी करता येणार आहे.

  मुंबई मेट्रो लाइन्स 2A आणि 7 बद्दल महत्त्वाच्या गोष्टी :

  1. मेट्रो लाइन 2A (पिवळी लाइन) ही अंधेरी पश्चिमेच्या दहिसर पूर्व आणि डीएन नगर या दोन ठिकाणांना जोडते. या मार्गाची लांबी सुमारे 18.6 किलोमीटर इतकी आहे. दुसरा टप्पा अंधेरी पश्चिम ते वलाणीपर्यंत नऊ किलोमीटरने वाढवण्यात आला असून, त्यात आठ स्थानकं आहेत. 16.5 किलोमीटर लांबीची मेट्रो लाइन 7 ही अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वेला जोडते. त्याच्या 5.2 किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्यात गोरेगाव पूर्व ते गुंदवलीपर्यंत चार स्थानकं वाढवण्यात आली आहेत. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन मेट्रो मार्गांमध्ये अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम इथल्या गुंदवली इथे नवीन इंटरचेंज स्टेशन असेल.

  हेही वाचा :  PM Modi Mumbai Visit : दौरा पंतप्रधान मोदींचा; चर्चा मात्र बाळासाहेबांसोबतच्या 'त्या' फोटोची 

  2. पहिली मेट्रो अंधेरी पश्चिम स्थानकावरून सकाळी सहा वाजता लाइन 2A वर धावेल आणि शेवटची मेट्रो रात्री 9.24 वाजता असेल. लाइन 7 ची पहिली मेट्रो सकाळी 5.55 वाजता गुंदवली स्थानकावरून सुरू होईल आणि शेवटची मेट्रो 9.24 वाजता असेल. पहिल्या तीन किलोमीटरसाठी 10 रुपये तिकीट असेल आणि तीन किलोमीटरनंतर अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल. एका रिपोर्टनुसार, तीन ते 12 किमी अंतरासाठी 20 रुपये, 12 ते 18 किमीसाठी 30 रुपये आणि 24 ते 30 किमीसाठी 50 रुपये आकारले जातील.

  3. एकत्रितपणे, या दोन मार्गांवरील मेट्रो ट्रेन्स 35 किलोमीटर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या पट्ट्यावर धावतील. या मार्गांवर एकूण 30 एडिव्हेटेड स्टेशन्स, 22 रेक असतील. दिवसभरात ठरलेल्या वेळेनुसार दर 10 मिनिटांच्या फ्रिक्वेन्सीने या ट्रेन सेट केल्या जातील.

  4. हे दोन्ही मेट्रो मार्ग मुंबईतला लिंक रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या दोन महत्त्वाच्या रस्त्यांवरून जातात. या दोन्ही मार्गांमुळे दररोज तीन-चार लाख प्रवाशांची वाहतूक, रहदारी आणि गर्दी कमी होणं आणि प्रवासाचा वेळ किमान 30 ते 50 टक्क्यांनी कमी होणं आदी बाबी अपेक्षित आहे. या मार्गांच्या माध्यमातून 2031पर्यंत दररोज किमान 10 लाख प्रवाशांना सेवा देण्याचं उद्दिष्ट आहे.

  हेही वाचा : Video : मोदींच्या मुंबईमधील सभेपूर्वीच बेकेसीमधील कमान कोसळली

  5. ट्रेनच्या कोचची 85 टक्के निर्मिती भारतात झालेली आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने त्यांची बांधणी केली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, 70 किलोमीटर ताशी वेगानं धावणारी ही ट्रेन जास्तीत जास्त 2280 प्रवासी घेऊन जाऊ शकते. प्रत्येक डब्यात 380 प्रवासी बसू शकतात. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र डबा असेल आणि प्रत्येक स्थानकावर एक महिला सुरक्षा अधिकारी आणि सीसीटीव्ही यंत्रणाही असेल. सुरुवातीला चालक डब्यांमध्ये उपलब्ध असतील; मात्र या ट्रेन अत्याधुनिक सिग्नलिंग प्रणालीसह चालकविरहित आहेत. त्यामुळे नंतर त्या चालकांविना काम करतील. या मेट्रो लाइन्सची पायाभरणी 2015मध्ये पंतप्रधान मोदी यांनीच केली होती.

  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी पश्चिम उपनगरातल्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह सर्व रस्त्यांवर दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घातली आहे. मोदींच्या दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग म्हणून राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) चार तुकड्या, दंगलविरोधी पथक आणि जलद कृती दलाची प्रत्येकी एक तुकडी नेमण्यात आली आहे. पोलिसांनी बीकेसी, अंधेरी, मेघवाडी आणि जोगेश्वरी या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स आणि रिमोट-कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्टसह कोणत्याही उड्डाणांवरदेखील बंदी घातली आहे.

  First published:
  top videos

   Tags: Narendra Modi, Pm modi