पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत, त्यांच्या हस्ते आज मुंबईमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मात्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गिरगावमध्ये अज्ञातांकडून काही पोस्टर लावण्यात आले आहेत, या पोस्टरमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पोस्टरमध्ये बाळासाहेबांच्या पुढे नरेंद्र मोदी हे झुकले आहेत असं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आता या नव्या पोस्टरमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आज मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे, या सभेच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर लावण्यात आले आहेत.
अज्ञाताकडून लावण्यात आलेल्या या पोस्टरमुळे पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.