• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • पंतप्रधान मोदींनी कौतुक केलेल्या बीडच्या तरुणाला UP धर्मांतर प्रकरणात अटक!

पंतप्रधान मोदींनी कौतुक केलेल्या बीडच्या तरुणाला UP धर्मांतर प्रकरणात अटक!

पोलिसांनी ताब्यात घेतलेला इरफान खान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा येथील रहिवासी आहे.

  • Share this:
बीड, 29 जून : उत्तर प्रदेशमध्ये (uttar pradesh) बेकायदेशीर धर्मांतर (religion conersion) करणाऱ्या तीन तरुणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये बीडमध्ये (beed) राहणाऱ्या इरफान शेखचा (irfan sheikh) समावेश असल्याची माहितीसमोर आली आहे. त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला इरफान खान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा येथील रहिवासी आहे, तो सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. दिल्लीतील मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअरमध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये यूपी एटीएसने ताब्यात घेतलेला आहे. शिरसाळ यातच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं. सध्या तो प्रोफेसर असून दिल्लीत वास्तव्यास आहे, असं त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं. IND vs ENG : रोहित-रहाणे बायो-बबलमधून बाहेर, एका खेळाडूने सोडलं इंग्लंड विशेष म्हणजे, अहमदाबाद येथील आयोजित विद्यालयात कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी सिरसाळा गावचे भूमीपुत्र माझे लहान भाऊ प्रा. इरफान खाजा खॉ. पठाण यांचं उत्कृष्ट कार्याबद्दल व्यासपीठावर स्वत: नरेंद्र मोदी यांनी कौतूक करत शाब्बासकीची थाप मारली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या, असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. अवैध धर्मांतरण प्रकरणांमध्ये इरफानचं नाव आल्यामुळे परिवाराला धक्का बसला आहे. इरफान असं करू शकत नाही, असं त्यांच्या मामांच्या म्हणणंआहे. मात्र बोलण्यास नकार दिला माहिती घेऊन बोलू, असं त्यांनी सांगितलं. काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशमधील (uttar Pradesh) शेकडो हजारों निरपराध मुले, महिला आणि इतरांच्या धर्मांतराबाबत उत्तर प्रदेश एटीएसनं धक्कादायक खुलासा केला. या प्रकरणामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला.  लवकरच उत्तर प्रदेश सरकार केंद्रीय गृह मंत्रालयाला लेखी पत्र देऊन या प्रकरणाची माहिती देणार असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि गुप्तचर यंत्रणेकडं या प्रकरणाची चौकशी सोपवली जाऊ शकते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असून, यामध्ये सामील असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश तपास यंत्रणांना दिले आहेत. दोषींवर गँगस्टरवर करतात त्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जास्त पगार की घरात मदत काय हवं? बायकोनेच ठरवावं आता काय हवं फतेहपूर जिल्ह्यातील पंथुआ गावात राहणारा उमर गौतम (Umar Gautam) क्षत्रिय कुटुंबातील आहे. उमरचे वडील धनराज सिंह हे नामांकित क्षत्रिय कुटुंबातील असून सरकारी अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. धनराजच्या 6 मुलांपैकी चौथा मुलगा उमर आहे. उमरचे पूर्वीचे नाव श्याम प्रताप होते. त्यानं 12 वी नंतर पंतनगर इथं कृषी अभ्यासक्रम आणि त्यानंतर एमएमयूमधून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्याचा विवाह शेजारच्या गावातील राजेश्वरी हिच्याशी झाला होता. उमरनं राजेश्वरीचंही धर्मांतर करून तिला रझिया केलं आणि स्वतः श्याम प्रताप उर्फ उमर गौतम बनला. धर्मांतर केल्यानं त्याला वडिलांनी कुटुंबातून बेदखल केलं.

काय आहे 'द स्लीपिंग लेडी' या पर्वतामागचं रहस्य? पाहा PHOTO

उमरचा चुलत भाऊ राजू सिंह यांच्या मते, त्याचं लग्न खेसहन गावच्या राजपूत कुटुंबात झालं होतं. दीड वर्षापूर्वी उमरचे वडील धनराजसिंग यांचं निधन झालं, परंतु वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही तो आला नाही. पहिला भाऊ उदयराज प्रताप सिंह, दुसरा उदय प्रताप सिंह, तिसरा उदयनाथ सिंह, चौथा उमर उर्फ श्याम प्रताप सिंह, पाचवा श्रीनाथ सिंह आणि सहावा क्रमांक दिवंगत ध्रुव प्रताप सिंह होता. सर्व भावांमध्ये जवळपास 75 बिघे जमीन आहे, ज्याची वाटणी झालेली नाही. हे कोणीच भाऊ गावात राहत नाहीत. या गावात त्यांचे चुलत भाऊच वास्तव्याला आहेत. उमर गौतम याचं एक संशयास्पद ट्विटर अकाउंटही आढळलं आहे, ज्यात त्यानं स्वत:ला दिवंगत पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांचा पुतण्या संबोधलं आहे. तसंच 20 वर्षांपूर्वी इस्लामचा (ISLAM) स्वीकार केल्याचंही म्हटलं आहे.
Published by:sachin Salve
First published: