• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • पेट्रोलच्या किंमती अमेरिकेत ठरवल्या जातात, रावसाहेब दानवेंचा नवा शोध, VIDEO

पेट्रोलच्या किंमती अमेरिकेत ठरवल्या जातात, रावसाहेब दानवेंचा नवा शोध, VIDEO

अमेरिकेत पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याने केंद्राला दोष दिला जात असल्याची दानवेंची अजब माहिती

  • Share this:
औरंगाबाद, 14 नोव्हेंबर : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol prices) वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. तर दरवाढीवरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे.  तर 'पेट्रोलच्या किमती या अमेरिकेत ठरवल्या जातात' असं अजब दावा केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज मोर्चा काढला होता. यावर बोलत असताना रावसाहेब दानवे यांनी नवीन दावा केला आहे. पेट्रोल महाग झाले म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेनं मोर्चा काढला. पेट्रोलबद्दल अर्थमंत्री बोलले यावर मी बोलणं योग्य नाही. पण, पेट्रोलचे दर हे जागतिक बाजाराशी लिंक केलेले आहे. ते किंमत वाढवण्याचे काम आता केंद्र सरकार करत नाही. काल ३५ पैसे कमी झाले, आता ५० पैसे वाढले हे काही आपलं सरकार खालीवर करत नाही. या किंमती अमेरिकेत ठरवल्या जातात. त्यामुळे आपल्याला सरकारला दोष देऊ नये, असं दानवे म्हणाले. तसंच, केंद्र सरकारने आपला कर कमी केला आहे. पण काँग्रेस असलेले सरकार आपला कर कमी करत नाही. लोकांना आपण हे सांगितलं पाहिजे, हा देश केंद्र सरकारच्या पैशावर चालला आहे, असा दावाही दानवेंनी केला. पत्नीसोबत अवैध संबंधातून पतीने रचला कट; दाम्पत्याने मजुराला दिला भयावह शेवट गुंठेवारीमध्ये धमकावण्याचे काम सुरू आहे. पालकमंत्री आले त्यांनी स्थगिती दिली. लोकांना धाक दाखवायचा आणि स्थगिती देऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत असं सांगायचं.  संभाजीनगरची जनता इतकी भोळी नाही. तुमच्यात दम असेल तर एक झोपडी पाडून दाखवा, भाजप एकही झोपडी पाडू देणार नाही,  असा इशाराच  दानवेंनी शिवसेनेला दिला.
Published by:sachin Salve
First published: