मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नीसोबत अवैध संबंधातून पतीने रचला कट; दाम्पत्याने मजुराला दिला भयावह शेवट

पत्नीसोबत अवैध संबंधातून पतीने रचला कट; दाम्पत्याने मजुराला दिला भयावह शेवट

दाम्पत्याने भयंकर पद्धतीने मजुराची हत्या केली.

दाम्पत्याने भयंकर पद्धतीने मजुराची हत्या केली.

दाम्पत्याने भयंकर पद्धतीने मजुराची हत्या केली.

  • Published by:  Meenal Gangurde

चित्रकूट, 14 नोव्हेंबर : राजापुरमधील खरुई येथे एका मजुराच्या हत्येनंतर (Murder) खळबळ उडाली आहे. विवाहबाह्य संबंधातून त्याची हत्या (Crime News) करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा मजूर अविवाहित होता, आणि गावातील एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. महिलेच्या पतीला याबाबत कळताच त्याने संताप व्यक्त केला आणि पत्नीला सोबत घेऊन मजुराची हत्या करण्याचा कट रचला. या दाम्पत्याने त्याला घरी बोलावून त्याची हत्या केली. पोलिसांनी हत्या करणाऱ्या दाम्पत्याला अटक केली आहे. हत्येसाठी वापरली गेलेली कुऱ्हाड आणि मोबाइलदेखील ताब्यात घेण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलीस अधिक्षक शैलेंद्र कुमार राय यांनी सांगितलं की, साधारण 38 तासात हत्येचा पर्दाफाश करण्यात आला. खरुई निवासी लालाराम निषाद याची हत्या गावातील सत्यनारायण आणि त्याची पत्नी सरोजा देवी यांनी केली होती. दोघांना अटक करून त्याच्याकडून मोबाइल फोन आणि कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. सत्यानारायणची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की, लालारामने लॉकडाऊनदरम्यान त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवले होते. मृत मजुर वारंवार सत्यनारायणाच्या घरी येत-जात होता. यानंतर दाम्पत्याने लालारामच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्यांनी 11 नोव्हेंबर रोजी कारस्थान रचलं. सरोजाने रात्री 9 वाजता फोन करून लालारामला घरी बोलावलं. तिचा पती घरात लपून बसला होता. योजनेनुसार लालाराम पोहोचल्यानंतर सत्यनारायणही बाहेर आला आणि पत्नीसोबत मिळून रश्शीने त्याच्या गळ्याभोवती फास आवळला.

हे ही वाचा-बेपत्ता पत्नी दिसताच तरुणाने स्वत:च पेटून घेतलं; मुंबईतील हैराण करणारं प्रकरण

लालारामच्या मृत्यूनंतर मृतदेह उचलून घराच्या मागील शेतात घेऊन गेले. त्यानंतर मृतदेह वाल्मीकी नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेले. मृतदेह पाण्यावर तरंगू नये यासाठी त्याने गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले आणि त्याच पोटही फाडलं. शरीरातील सर्व गॅस निघून जावी हा यामागील हेतू होता. यानंतर त्याच रश्शीने मृतदेह दगडाने बांधून पाण्यात फेकून दिला.

First published:

Tags: Crime news, Murder